GST Bill Fraud Alert
GST Bill Fraud Alert esakal
नाशिक

GST Bill Fraud Alert: जीएसटी बिलासाठी अतिरिक्त पैशांची मागणी? ग्राहकांनो, फसवणूक थांबविण्यासाठी घ्या मदत केंद्राचा लाभ

सकाळ वृत्तसेवा

GST Bill Fraud Alert : वस्तू खरेदीनंतर पक्के बिल पाहिजे असल्यास जीएसटीचे पैसे अतिरिक्त द्यावे लागतील, असा कांगावा काही व्यापारी व दुकानदार ग्राहकांकडे करीत आहेत. मात्र हा प्रकार नियमाला धरून नसून वस्तूची विक्री किंमत निर्धारित करताना त्यामध्ये जीएसटीची रक्कमही समाविष्ट असते. पण काही व्यापारी व दुकानदारांकडून ग्राहकांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे. (GST Bill Fraud Alert)

असे घडल्यास ग्राहक जीएसटी विभागाकडे रीतसर तक्रारही करू शकतो, यासाठी ऑनलाइन टोल क्रमांक व ॲपही उपलब्ध असून त्याचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (nashik Fraud Alert Demanding extra money for GST bill Consumers take advantage of help center to stop fraud marathi news)

खरेदी केलेल्या वस्तूचे बिल मागणे हा ग्राहकाचा अधिकार असून व एमआरपी रकमेचेच बिल देणे हे दुकानदार वा व्यापाऱ्याचे कर्तव्य आहे. अलीकडच्या काही काळात ग्राहकांकडून अतिरिक्त आर्थिक फायदा मिळवण्यासाठी बिल पाहिजे असेल तर जीएसटीचे पैसे द्यावे लागतील, असे सांगितले जाते.

तरीही पक्के बिल न देता जुजबी कॅश मेमोवर अतिरिक्त पैसे जोडून दिले जातात. यासाठी ग्राहकांनी व्यवहाराबद्दल अधिक सजग होऊन ग्राहकांनी दुकानदारांचा जीएसटी नंबर हा जीएसटी वेबसाईटवर चेक केला पाहिजे. कधी-कधी साध्या कागदावरही अनधिकृत जीएसटी नंबर देऊन अतिरिक्त पैसे काढण्याचेही प्रकार समोर येत आहेत.

जागरूकता केंद्र कार्यरत

केंद्र शासनाकडून ‘मेरा बिल मेरा अधिकार’ हे घोषवाक्य म्हणजे ‘माय बिल माय राइट’ ही मोहीम राबविली जाते. ग्राहकांना प्रत्येकवेळी खरेदी करताना विक्रेत्यांकडून जीएसटी इनव्हॉइस/बिल मागण्याच्या त्यांच्या अधिकाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी केंद्र सुरू केली आहे. जीएसटी संदर्भात माहिती, सूचना ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध आहेत. ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा.

येथे साधा संपर्क

हेल्प डेस्क cbecmitra.helpdesk@icegate.gov.in.

हेल्पलाइन: १८००-१२००-२३२.

एक्स: @askGST_GOI

ॲप: मेरा बिल मेरा अधिकार

"वस्तू खरेदी करताना एमआरपीची खातरजमा करूनच वस्तू खरेदी करावी त्यावर अतिरिक्त पैसे देण्याची गरज अजिबात नाही. जीएसटी रक्कम ही वस्तूची किंमत निर्धारित करताना त्यामध्ये समाविष्ट असते. ग्राहकांनी स्वतःची फसवणूक करून घेऊ नये. आर्थिक व्यवहार करताना सजग असावे."- अमित पळसुले, चार्टर्ड अकाउंटंट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT