crime esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : बांधकाम व्यावसायिकाला 28 कोटींचा गंडा; जागा मालकाने संगनमताने केली फसवणूक

Fraud Crime : गंगापूर रोड परिसरातील राठी अमराई येथील जागा विकसित करण्याच्या बहाण्याने बांधकाम व्यावसायिकाला जागा मालकांनीच तब्बल २८ कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fraud Crime : गंगापूर रोड परिसरातील राठी अमराई येथील जागा विकसित करण्याच्या बहाण्याने बांधकाम व्यावसायिकाला जागा मालकांनीच तब्बल २८ कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहर आर्थिक गुन्हे शाखेने संशयित विजय जगन्नाथ राठी (वय ७२) यास अटक केली असून, त्यास न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ()

विजय जगन्नाथ राठी, कौसल्याबाई जगन्नाथ राठी, सुजाता सतिष मंत्री, अर्चना श्रीकुमार मालानी, श्रुती सुशांत लढ्ढा, आदिती प्रणय अग्रवाल, दीपक जगन्नाथ राठी, वृंदा अरविंद राठी, सुष्मा बाळकृष्णा काबरा अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. विजय कचरदास बेदमुथा (रा. दत्त मंदिर चौक, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित राठी कुटुंबीयांच्या मालकीची गंगापूर रोड परिसरात राठी आमराई म्हणून १ हेक्टर ५४ आर क्षेत्रफळ असलेली जागा आहे.

सदरील प्लॉट विकसित करण्यासाठी संशयितांनी बांधकाम व्यावसायिक असलेले विजय बेदमुथा यांच्याशी करार केला. प्लॉट विकसनाचा व्यवहार झाल्यानंतर राठी यांनी बेदमुथा यांच्याकडून १९ कोटी ४१ लाख ५५ हजार २६९ रुपये घेतले होते. तर बेदमुथा यांनी जागा विकसित करण्यासाठी ८ कोटी ६२ लाख ५७ हजार २०६ रुपयांचा खर्च केला. असा एकूण त्यांनी जागा विकसितसाठी २८ कोटी १० लाख १२ हजार ४७५ रुपयांचा खर्च केला आहे. (latest marathi news)

दरम्यान, संशयित राठी यांनी सदरची जागा विकसित करण्यासाठी न देता बेदमुथा यांच्या पैशांचा अपहार केला. यामुळे सदरचे प्रकरणी न्यायालयात दावा प्रलंबित आहे. असे असतानाही संशयित राठी कुटुंबीयांनी या जागेचा विकसित करारनामा दुसऱ्या बांधकाम व्यावसायिकाशी केल्याचे फिर्यादी बेदमुथा यांना समजले. त्यामुळे त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली.

त्यानुसार, सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्हा तपासाकामी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेने संशयित विजय राठी यास अटक केली आहे. गुरुवारी (ता. ४) न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक किशोर कोल्हे हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: अजित पवारांनी विजय वडेट्टीवारांची घेतील सांत्वनपर भेट

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT