Naresh Karda
Naresh Karda esakal
नाशिक

Nashik Naresh Karda Fraud Case: बिल्डर कारडा यांच्या अर्जावर उद्या पुन्हा सुनावणी; MPID विरोधात जिल्हा न्यायालयात धाव

सकाळ वृत्तसेवा

Nashik Naresh Karda Fraud Case : शहरातील नामांकित कारडा कन्स्ट्रक्शनचे नरेश कारडा यांच्याविरोधात उपनगर पोलिसांनी एमपीआयडी दाखल केला आहे. याविरोधात कारडा यांनी न्यायालयात धाव घेतली असता, त्यावर उद्या सुनावणी असून, उद्या पुन्हा त्यावर सुनावणी होणार आहे. (Nashik fraud crime Builder Karda MPID marathi news)

बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांच्याविरोधात फसवणुकीचे आत्तापर्यंत ७ गुन्हे दाखल झाले आहेत. उपनगर पोलिसात तीन गुन्हे दाखल असून, उपनगर पोलिसांनी कारडा यांच्याविरोधात एमपीआयडी दाखल केला आहे. सध्या जामीनावर असलेले कारडा यांनी एमपीआयडीविरोधात नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली.

त्यावर सोमवारी (ता. १५) सुनावणी सुरू झाली. परंतु वेळेअभावी सुनावणी अपूर्ण राहिल्याने मंगळवारी (ता. १६) पुन्हा सुनावणी होणार आहे. न्यायालयात दोन्ही पक्षातर्फे युक्तिवाद झाल्यानंतर एमपीआयडीसंदर्भात निर्णय देणार आहे. (latest marathi news)

कारडा यांच्याविरोधात फसवणुकीसंदर्भात उपनगर पोलिसात तीन, मुंबई नाका, देवळाली कॅम्पमध्ये प्रत्येकी एक तर नाशिकरोड पोलिसात दोन गुन्हे दाखल आहेत. आर्थिक गुन्हेशाखेने कारडा यांना अटक केली होती. कारडा सध्या जामीनावर बाहेर आहेत. मात्र नवनवीन गुन्हे दाखल होत असल्याने कारडा यांच्यासमोरील अडचणी वाढत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Exit Poll: सांगलीची पाटीलकी विशाल पाटलांकडे? भाजपला बसणार अँटी इनकबन्सीचा फटका

Mumbai Rain Update : मुंबईत पाऊस कधी येणार? जाणून घ्या हवामान अभ्यासकांचा अंदाज

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Lok Sabha Election Result 2024 : ‘इंडिया’ चेच सरकार येणार 'तेजस्वी यादव' यांचा विश्‍वास: एनडीए हद्दपार होणार

Lok Sabha 7th Phase Voting : देशात सातव्या टप्प्यात ५९ टक्के मतदान! पश्चिम बंगालात सर्वाधिक तर यूपीत सर्वात कमी मतदान

SCROLL FOR NEXT