Fraud Crime esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : मंत्र्यांचा पीए असल्याचे सांगत 80 लाखांना गंडा

Nashik Crime : मंत्र्यांचा स्वीय सहाय्यक असल्याची बतावणी करून अनेकांना गंडा घालणाऱ्या कथित ‘पीए’ने एका दांपत्याला शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ८० लाखांना गंडा.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fraud Crime : मंत्र्यांचा स्वीय सहाय्यक असल्याची बतावणी करून अनेकांना गंडा घालणाऱ्या कथित ‘पीए’ने एका दांपत्याला शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ८० लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार २०२१ ते मे २०२३ दरम्यान घडला. दरम्यान, संशयित ‘पीए’ला गंगापूर पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. कथित पीएविरोधात यापूर्वीही गुन्हा दाखल झाला आहे. (Nashik Fraud Crime Extorting 80 lakhs by claiming to be Ministers PA)

सुशिल भालचंद्र पाटील (रा. लोचन अपार्टमेंट, मधुबन कॉलनी, पंचवटी) असे अटक केलेल्या संशयित कथित ‘पीए’चे नाव आहे. सुभाष सुरेश चेवले (रा. आनंदवल्ली, गंगापूर रोड) यांची २०२१ मध्ये संशयित पाटील याच्याशी ओळख झाली. टेलिकॉम व्यावसायिक असलेले चेवले यांच्यासह पत्नीला शासकीय नोकरी लावण्याचे आमिष संशयित पाटील याने दाखविले होते.

चेवले यांच्याशी ओळख झाल्यानंतर त्याने त्यांचा विश्वास संपादन केला आणि स्वत:ची ओळख त्यावेळी असलेल्या मंत्र्यांचा पीए असल्याचे सांगितले. चेवले यांनाही ते खरे वाटले. त्यामुळे शासकीय नोकरीसाठी त्यांच्याकडून संशयिताने ८० लाख रुपये घेतले. विशेषत: शासकीय सेवेतील उच्चपदस्थ नोकरीचे बनावट नियुक्तीपत्रही संशयित पाटीलने दिले.

मात्र, पडताळणी केली असता, नियुक्तीपत्र बनावट असल्याचे समजले. फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर चेवले यांनी संशयिताकडे पैशांची मागणी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ केली. (latest marathi news)

अखेर चेवले यांनी गंगापूर पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, गंगापूर रोड भागात राहणाऱ्या पाटीलने घर बदलून २०२२ पासून मखमलाबाद भागात वास्तव्य सुरू केले आहे. गंगापूर पोलिसांनी त्यास अटक केली आहे.

पाटील सराईत

संशयित पाटील याने यापूर्वीही अनेकांना शासकीय नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केली आहे. पाटील याच्याविरोधात २०२३ मध्ये दोन कोटी ७६ लाखांच्या अपहाराचा गुन्हा दाखल आहे, तसेच धुळे जिल्हा परिषद (गट ‘क’), महिला व बालकल्याण, बांधकाम विभाग, उत्पादन शुल्क विभाग, जिल्हा परिषद, अन्न व औषध प्रशासन.

वन विभागासह अनेक विभागांमध्ये नोकरीच्या जाहिराती दाखवून अनेकांना गंडा घातला आहे. यासंदर्भात फसवणूक झालेल्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: ७ सुवर्ण, ३ रौप्य.. बॉक्सिंगपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताची Medal Table मध्ये उत्तुंग भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचले

Commonwealth Games 2026: सचिन... सचिन... पंचांनी १ गुण वजा केला, भारताचा बॉक्सर पेटला; तिसऱ्या फेरीत मुक्क्यांची बरसात करून जिंकले सुवर्ण...

Education Initiative: चिमुकल्या इरफानच्या आठवणीत अमळनेरमध्ये शिक्षणसेवेचा संकल्प; गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप उपक्रम

Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...

Video: जुनं वचन पाळलं! मित्राची सैन्यात निवड होताच खांद्यावर बसवून काढली गावभर मिरवणूक; कोल्हापूरचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT