crime news esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : तुमच्या नातवाचा अपघात झाल्याचे सांगून भामट्याने आजीबाईला घातला गंडा

Crime News : उपचारासाठी पैशांची गरज असल्याची बतावणी करत अज्ञात भामट्याने त्यांच्या गळ्यातील दिड तोळ्यांची पोत काढून नेल्याची घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

वावी : सिन्नर तालुक्यातील नांदुरशिंगोटे येथे 63वर्षीय महिलेला तुमच्या नातवाचा अपघात झाला असून उपचारासाठी पैशांची गरज असल्याची बतावणी करत अज्ञात भामट्याने त्यांच्या गळ्यातील दिड तोळ्यांची पोत काढून नेल्याची घटना घडली. (Nashik Fraud Crime thief cheated old women at sinnar marathi news)

सुशिला शिवाजी शेळके (६३) रा. नांदुर-निमोण रस्ता या शनिवारी सायंकाळच्या सुमारास घराजवळच्या शेतात काम करत होत्या. यावेळी अंदाजे ३० ते ३५ वर्षीय भामटा दुचाकीवरुन तेथे आला. त्याने सुशिला यांना तुमच्या गणुचा मुलगा पडला असून त्याला जबर दुखापत झाल्याचे सांगितले.

त्याला दवाखान्यात न्यायचे असून गणुने पैसे आणण्यासाठी तुमच्याकडे पाठवल्याचे तो म्हणाला. तसेच पैसे नसेल तर गणुने तुमच्या गळ्यातील पोत व पावती मागीतली असल्याचे तो सुशिला यांना म्हणाला. नातवाचा अपघात झाल्याचे ऐकून प्रचंड घाबरलेल्या सुशिला यांनी कुठलीही विचारपुस न करता आपल्या गळ्यातील दिड तोळ्यांची पोत दुचाकीवरुन आलेल्या या भामट्याच्या हातात दिली. (Latest Marathi News)

त्याने सोन्याची पोत हातात पडल्यावर तेथून पोबारा केला. रात्री घरी गेल्यावर त्यांच्या मुलाने असे काही घडले नसल्याचे सांगितले. नातू सुखरुप असल्याचे व त्याच्याशी प्रत्यक्ष बोलणे झाल्यावर त्यांना आपण लुटलो गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी वावी पोलिस ठाण्यात अज्ञात भामट्याच्या विरोधात श्रीमती शेळके यांनी तक्रार दाखल केली. साहेब पोलीस निरीक्षक संदेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक देविदास लाड तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT