Fraud Crime esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : तोतया डॉक्‍टरकडून महिला वकिलाची फसवणूक

Latest Crime News : वजन कमी करण्याच्‍या बहाण्याने महिला वकिलास व्हिडिओ कॉल करून, त्‍यावरील चित्रीकरण व छायाचित्रे काढत ते व्‍हायरल करण्याची धमकी तोतया डॉक्टरने दिली व त्या बदल्यात पैसे उकळले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fraud Crime : तोतया डॉक्‍टरने महिला वकिलाची फसवणूक केल्‍याचा प्रकार समोर आला आहे. वजन कमी करण्याच्‍या बहाण्याने महिला वकिलास व्हिडिओ कॉल करून, त्‍यावरील चित्रीकरण व छायाचित्रे काढत ते व्‍हायरल करण्याची धमकी तोतया डॉक्टरने दिली व त्या बदल्यात पैसे उकळले. (Fraud Crime Woman lawyer cheated by fake doctor)

या प्रकरणी संशयित नीलेश अशोक पगार ऊर्फ निल पाटील याच्याविरुद्ध तक्रारीवरून सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत नमुद केल्‍यानुसार, महिला वकिलास संशयिताने संपर्क साधत तो डॉक्टर असल्‍याचे भासविले. नीलेशने वजन कमी करण्यासाठी उपचार करण्याबाबत सुचविले.

उपचाराच्‍या बहाण्याने महिला वकिलाला व्हिडिओ कॉल करत, महिलेचे चित्रीकरण व छायाचित्र टिपले. त्यानंतर वेगवेगळ्या बहाण्याने, धमकावत थेट महिला वकिलाच्‍या कार्यालयात जाऊन त्‍यांच्‍याकडून चार लाख २४ हजार रुपये उकळले. यापैकी तीन लाख ४४ हजार रुपये त्याने परत केले.

नीलेश हा तोतया डॉक्‍टर असल्‍याचे महिलेला कळल्‍यानंतर त्‍यांनी त्याच्यासोबत संपर्क टाळला. मात्र नीलेशने मोबाईलवरून महिलेचा पाठलाग करत, त्रास देण्यास सुरवात केली. मंगळवारी (ता. २४) दुपारी संशयित नीलेशने महिला वकिलाचे कार्यालय गाठत पुन्हा तीन लाख रुपयांची मागणी केली व पैसे न दिल्‍यास व्हिडिओ आणि छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर महिलेने सरकारवाडा पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली. (latest marathi news)

संशयिताचे कारनामे उघड

संशयिताने डॉक्टर असल्याचे भासवीत महिलांना फसवत असल्‍याचे प्रकार समोर येत आहेत. यापूर्वी इंदिरानगर येथील महिलेला उपचाराच्या बहाण्याने व्हिडिओ कॉल करत, चित्रीकरण व छायाचित्रे काढताना पैसे उकळले होते.

वारंवार फोन, मेसेज करून तिचा पाठलाग करायचा. यानंतर महिलेने इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल केला होता. आता फसवणुकीची दुसरी घटना समोर आली असून, आणखी काही महिलांची त्‍याने फसवणूक केली आहे का, या अनुषंगाने पोलिस यंत्रणा तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: कपडे फाटेपर्यंत मारेन…, महिला ट्रॅफिक पोलिसांसोबत प्रवाशाचे अश्लील वर्तन; मुंबईत नेमकं काय घडलं? VIDEO VIRAL

Vasota Fort Tourism Development : वासोटा किल्ल्याचं रूप पालटलं! आता दरीच्या टोकावर उभं राहून फोटो काढणं होणार सोपं; गडावर वन विभागानं असं काय केलंय?

Latest Marathi News Live Update : अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का, जिल्हा उपाध्यक्षांचा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा

Mulank : 'या' 3 महिन्यात जन्मलेल्या लोकांचे 35 वयानंतर चमकते नशीब; असतात लक्ष्मी-कुबेरचे लाडके, पण त्याआधी करावा लागतो खूप संघर्ष

Investment Planning: गुंतवणुकीत एक्झिट स्ट्रॅटेजी नसलेल्या गुंतवणूकदारांवर का येते पश्चात्तापाची वेळ?

SCROLL FOR NEXT