Fraud Crime esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : इथेनॉल कंपनीत गुंतवणूकीतून दाम्पत्याला 2 कोटींचा गंडा

Fraud Crime : दाम्पत्याला तब्बल २ कोटी ११ लाखांना गंडा घातल्याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : इथेनॉल कंपनी खरेदीसाठी भागीदारी केल्यानंतर, त्यात आर्थिक गुंतवणूक केली. मात्र त्यानंतर, कंपनीतील भागीदार रद्द करण्यास भाग पाडून संशयितांनी दाम्पत्याला तब्बल २ कोटी ११ लाखांना गंडा घातल्याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांमध्ये महाराष्ट्र बँकेच्या व्यवस्थापकाचाही समावेश आहे. (Couple cheated 2 crore by investing in ethanol company )

मुकेश राठोड, त्याची पत्नी, सौरभ राठोड, प्रणव राठोड, राहुल पवार, सीए रॉबिन, महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक गिरीश शेट्टी, हायड्रोस कुट्टी अशी संशयितांची नावे आहेत. रेवती अश्वीन मोरे (रा कलानगर, म्हसरुळ) यांच्या फिर्यादीनुसार, ऑगस्ट २०१८ मध्ये संशयित मुकेश राठोड याने आरसीलच्या इथेनॉल कंपनी खरेदीसाठी भागीदारी करण्यात आली. त्यासाठी मोरे दाम्पत्याने पैशांसह दागदागिने व स्थावर मालमत्ता तारण ठेवून कंपनी सुरू करण्यासाठी आर्थिक गुंतवणूक केली.

मात्र नंतर संशयितांनी मोरे यांना भागीदारी रद्द करण्यासाठी भाग पाडले. त्यासाठी कॅन्सल धनादेशावर स्वाक्षरी घेतली परंतु गुंतवणूक केलेली रक्कम परत केली नाही. कंपनी सुरळीत सुरू झाल्यानंतरही मोरे यांची २ कोटीं ११ लाख २० हजार रुपयांची रक्कम परत न करता संशयितांनी त्यांची फसवणूक केली. तसेच सेटलमेंटची कागदपत्रे बनावट तयार करून ते खरे भासविण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT