At the time of ticket inspection at the railway station. esakal
नाशिक

Nashik News : रेल्वेस्थानकावर फुकट्या प्रवाशांना दंड; तिकीट तपासणी जोमात

Nashik : नाशिक रोड रेल्वेस्थानकावर सध्या उन्हाळी सुट्यांमुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक रोड रेल्वेस्थानकावर सध्या उन्हाळी सुट्यांमुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत आहे. पर्यटक फिरण्यासाठी नाशिकला पसंती दर्शवत आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या नाशिक रोड रेल्वेस्थानकावर तिकीट तपासणी मोहीम मोठ्या सक्तीने राबविली जात आहे. फुकट्या प्रवाशांवर तिकीट तपासणीस निरीक्षण करून त्यांना दंड करत आहेत. (Nashik Free passengers fined at railway station )

नाशिक रोड रेल्वेस्थानक हे उत्तर महाराष्ट्रातील नव्हे, तर भारतातील एक महत्त्वाचे रेल्वेस्थानक समजले जाते. येथे रोज ५२ गाड्या मार्गक्रमण करतात. त्याचप्रमाणे काही विशेष गाड्या हप्त्यातून मार्गक्रमण करतात. नाशिकला त्र्यंबकेश्वर, वणी, मांगीतुंगी, पंचवटी व इतर धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी नागरिक येथे उतरतात. सध्या नाशिक रोड रेल्वेस्थानकावर मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर फुकटे प्रवासी मोठ्या प्रमाणावर प्रवास करीत आहे. (Latest Marathi News)

रेल्वेस्थानकावर तिकीट तपासणीस नजर ठेवून आहे. फुकट्या प्रवाशांना कडक शासन केले जात आहे. विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करून दंड वसूल केला जात आहे. विशेष करून प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आणि चारवर ही मोहीम मोठ्या दिमाखात सुरू आहे. यामुळे रोज किमान अंदाजे ३० ते ३५ हजार दंड वसूल केला जात आहे. रोज ४० ते ५० केसेस होत असल्याची माहिती तिकीट तपासणीस यांनी ‘सकाळ’ला दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT