Slum Canva
नाशिक

नाशिक : संत गाडगे महाराज वसाहतीत पोट भाडेकरू

३३ पुनर्वसितांना फौजदारी नोटिसा, वसाहत खाली करणार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : काझी गढीची भिंत कोसळल्यानंतर पुनर्वसन करण्यात आलेल्या श्री. संत गाडगे महाराज वसाहतीतील खोल्यांमध्ये पोट भाडेकरू ठेवल्याची बाब महापालिकेच्या पाहणीत आढळून आली. संबंधित ३३ पुर्नवसित नागरिकांना महापालिकेकडून फौजदारीच्या नोटिसा बजावताना पुनर्वसनासाठी देण्यात आलेली तीस वर्षांची मुदत संपुष्टात आल्याने वसाहत खाली करण्याचा निर्णय घेतला आहे.

१९८५ मध्ये गाडगे महाराज धर्मशाळेच्या मागील बाजूच्या गढीचा भाग पावसाळ्यात कोसळला होता. त्यावेळी महापालिकेने सर्वेक्षण केले. त्यात सुमारे ७२ कुटुंबे धोकादायक स्थितीत वास्तव्य करत असल्याची बाब आढळली. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी महापालिकेकडून मुंबई- आग्रा महामार्गावरील काशी माळी मंगल कार्यालयाच्या मागील बाजूला सर्वे क्रमांक  ३९८ मधील जागा ३० वर्षे कराराच्या मुदतीवर घेताना त्या जागेवर वस्ती करण्यास परवानगी दिली. जागेचा उपयोग पुनर्वसितांनी स्वतःच्या रहिवासाकरीता करावा, या अटीवर ही जागा दिली होती. जागा हस्तांतराचा करार करताना विक्री वा हस्तांतराला परवानगी नव्हती.

२०१५ मध्ये तीस वर्ष कराराची मुदत संपल्यानंतर महापालिकेने जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, परंतु राजकीय अडसर निर्माण केला गेला. मुदत संपुष्टात आल्यानंतर सहा वर्षांनी महापालिकेच्या पथकाने अचानक जागेची पाहणी केली. त्यात ३३ नागरिकांनी जागांवर पोटभाडेकरू नियुक्त केल्याची बाब समोर आली. करारनाम्याचा भंग झाल्याने विविध कर विभागाकडून नोटीस बजावण्यात आली.

राजकीय आडकाठीमुळे कारवाई नाही

महापालिकेने तीस वर्षांचा करार केला होता. आठ एप्रिल २०१५ मध्ये कराराची मुदत संपुष्टात आल्याने राजकीय आडकाठीमुळे कारवाई झाली नाही. त्यामुळे आता पोटभाडेकरू ठेवणाऱ्यांना नोटीस बजावताना वसाहत खाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान वसाहत खाली करण्याऐवजी मुदतवाढ द्यावी व त्यासाठी ९९ वर्षाचा करार करावा, अशी मागणी संत गाडगे महाराज रहिवासी संघाच्या सदस्यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांच्याकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT