Gaikwad Auditorium esakal
नाशिक

Nashik News : पांढरा हत्ती ठरलेल्या गायकवाड सभागृहाची भाडेवाढ; मालमत्ता विभागाकडून 3 वर्षांसाठी प्रस्ताव

Nashik : पांढरा हत्ती पोसण्यासारखी स्थितीत असलेल्या भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या भाडेदरात सरासरी दहा टक्के वाढ करण्यात आली असून, ही वाढ पुढील तीन वर्षासाठी राहणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पांढरा हत्ती पोसण्यासारखी स्थितीत असलेल्या भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या भाडेदरात सरासरी दहा टक्के वाढ करण्यात आली असून, ही वाढ पुढील तीन वर्षासाठी राहणार आहे. आधीच प्रेक्षकांनी पाठ फिरविलेल्या या सभागृहाच्या नियमावलीत व भाडेवाढ करताना मिळकत विभागाने सावध भूमिका घेतली असून, आता तीन वर्षानंतरच दरवाढ होईल असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे सभागृह असलेल्या दादासाहेब गायकवाड सभागृहाची महापालिकेने २००५ मध्ये निर्मिती केली आहे. ( Gaikwad Auditorium rent increase proposed by Property Department for 3 years )

या सभागृहाची आसन क्षमता २७०० आहे. त्यामुळे राजकीय कार्यक्रम किंवा मोठ्या संस्थांच्या परिषदा या सभागृहात होतात. परंतु त्या व्यतिरिक्त अन्य कार्यक्रमांसाठी गायकवाड सभागृहात फारसा प्रतिसाद मिळत नाही. या उलट सभागृहावर महापालिकेला अधिक खर्च करावा लागतो. १९ वर्षांपूर्वी गायकवाड सभागृहाची निर्मिती केली, तेव्हापासून आतापर्यंत कुठल्याही प्रकारची भाडेवाढ व नियमावलीत बदल केले नव्हते.

मात्र आता मिळकत विभागाने सुधारित नियमावली व भाडेवाढीचा प्रस्ताव महासभेसमोर ठेवला आहे. सुधारित नियमावलीनुसार सकाळी दहा ते दुपारी तीन प्रथम सत्र व सायंकाळी पाच ते रात्री दहा असे दुसरे सत्र राहणार आहे. त्याचबरोबर रात्री ११ ते सकाळी नऊपर्यंत वेळ ही कार्यक्रमांच्या तयारीसाठी आरक्षित ठेवली आहे. तिमाहीसाठी सभागृहाचे आरक्षण उपलब्ध राहणार आहे.

जानेवारी ते मार्च एप्रिल ते जून जुलै ते सप्टेंबर व ऑक्टोबर ते डिसेंबर, असे आरक्षण राहील. एका तिमाहीत अर्जदारास किंवा संस्थेला दहा दिवसांपेक्षा जास्त दिवस आरक्षण ठेवता येणार नाही. कार्यक्रम रद्द झाल्यास व आठ दिवस अगोदर कळविल्यास सर्व भाडे जप्त करण्याची कारवाई केली जाणार आहे. पंधरा दिवस अगोदर कार्यक्रम रद्द झाल्याचे कळविले ६० टक्के, एक महिना अगोदर कार्यक्रम रद्द झाल्याचे कळविल्यास ४५ टक्के रक्कम जप्त होणार आहे. (latest marathi news)

४५ अगोदर दिवस कळविल्यास ३० टक्के, तर साठ दिवस अगोदर कार्यक्रम रद्द झाल्याचे कळविण्यात १५ टक्के भाडे जप्त करण्याची कारवाई केली जाणार आहे. दरम्यान गायकवाड सभागृहाची भाडेवाढ करताना मंजुरी मिळाल्यानंतर यापुढे तीन वर्षांनी दहा टक्के भाडेवाढ केली जाणार असल्याचे सुधारित नियमावली प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

त्याचबरोबर कार्यक्रमाला एक तास उशीर झाल्यास एक हजार रुपये व त्यानंतर संपूर्ण सत्राचे भाडे आकारले जाणार आहे. समाजपयोगी किंवा मोफत कार्यक्रम असल्यास तिकीट किंवा पासवर मोफत कार्यक्रम, असे लिहिणे बंधनकारक आहे अन्यथा पाच हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

असे आहेत प्रस्तावित दर

- शैक्षणिक संमेलन (दहावीपर्यंत)- १० हजार रुपये (प्रति ५ तास)

- गायन, वादन, नृत्य, तमाशा, व्याख्यान, नाटक, जादूचे प्रयोग- १५ हजार (प्रति ५ तास)

- अधिवेशन, मेळावा, युवा महोत्सव, सौंदर्य स्पर्धा- १५ हजार (प्रति ५ तास)

- विवाह स्वागत समारंभासाठी- ५० हजार (सायंकाळी ५ ते दुसरे दिवस सायंकाळी ५ पर्यंत)

- विवाह सोहळ्यासाठी- ५० हजार रुपये (सायंकाळी ५ ते दुसरे दिवस सायंकाळी ५ पर्यंत)

- कार्यक्रम तयारीसाठी- सहा हजार रुपये (प्रति ५ तास)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ७०–८० वयातही शिकण्याची धडपड! महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे ‘आजीबाईंची शाळा’; व्हायरल व्हिडिओ पाहून व्हाल भावूक

नव्या नवरीवर भारी पडला जाऊबाईंचा तोरा! अनुष्कापेक्षा सुंदर दिसते तिची जाऊ; मेघनच्या वहिनीला पाहिलंत का?

Horoscope Prediction : उद्या तयार होतोय गजकेसरी राजयोग; मिथुन राशीबरोबर पाच राशींना लागणार जॅकपॉट !

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

IPL मध्ये कॅप्टनला जाब विचारला जातो...केएल राहुलचा LSG चे मालक गोयंकांवर अप्रत्यक्ष निशाणा?

SCROLL FOR NEXT