नाशिक

नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसरात ‘काला-पिला’ जुगारावर गुन्हे शाखेचा छापा; १३ जणांना अटक

CD
रेल्वेस्थानक परिसरात तीनपत्ती जुगारावर छापा १३ जण ताब्यात; मुंबई, ठाणे, अहमदाबादसह विविध शहरांतील संशयितांचा सहभाग सकाळ वृत्तसेवा नाशिक रोड, ता. १४ : रेल्वेस्थानक परिसरात दुप्पट पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवत ‘काला-पिला’ नावाचा तीनपत्ती जुगार खेळवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीवर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकने छापा टाकला. या कारवाईत १३ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले, तर पोलिसांची चाहूल लागताच पाच ते सहा जण पसार झाले. पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये मुंबई, ठाणे, अहमदाबाद, चिपळूण आणि छत्रपती संभाजीनगर येथील व्यक्तींचा समावेश आहे. १३ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास कोंडाजी चिवडा आणि वावरे बंधू यांच्या दुकानांसमोरील सार्वजनिक ठिकाणी जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेचे अंमलदार संदीप भांड आणि उत्तम पवार यांना मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रमीज शेख यांच्या पथकाने पंचांसह सापळा रचला. रात्री ११.४१ वाजता छापा टाकून १३ जणांना ताब्यात घेतले. चौकशीत जुगाराची पद्धत नियोजनबद्ध असल्याचे समोर आले. नागरिकांना दुप्पट पैसे मिळण्याचे आमिष दाखवून खेळात सहभागी केले जात होते. टोळीतील काही सदस्य ग्राहक बनून सुरुवातीला पैसे लावत आणि ठरल्याप्रमाणे जिंकत असत. त्यामुळे इतरांचा विश्वास संपादन केला जात होता. त्यानंतर हातचलाखीने पैसे जिंकून घेत नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या जुगारासाठी कलकत्ता येथून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी माणसे पुरविली जात असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. या व्यवहारात संबंधितांना पाच टक्के कमिशन दिले जात असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. नाशिकमध्ये माणसे बोलावणे, पैशांचे वाटप करणे तसेच जुगाराच्या ठिकाणी वाद मिटविणे आणि संरक्षण देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असल्याचेही पोलिसांनी सांगितले. या कारवाईत सिकंदर अब्दुल सत्तार रेहमान, इस्तेखार हकीमुद्दीन अन्सारी, अफजल लियाकत खान, रियाजुद्दीन अब्दुल कय्युम मनियार, ओमकार चंद्रकांत महाडीक, सुनीलकुमार कालीप्रसाद चंद्रवंशी, रवी जगदीश शर्मा, मोहम्मद शाहीद मेहबूब आलम शेख, गुरुदत्त किशन यादव, आरिफ रमजान खान, राकेशकुमार सिताराम सिंह, कुंदनसिंग जब्बरसिंग राजपूत आणि प्रदीप सुभाष अग्रवाल यांना ताब्यात घेण्यात आले. फरार साथीदारांचा शोध सुरू या प्रकरणात संतोष गुदणीये, मुन्या मामू ऊर्फ फिरोज, अश्पाक शेख, शब्बीर आणि आकाश यांच्यासह अन्य साथीदारांचा सहभाग असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. फरार संशयितांचा शोध सुरू असून, जुगाराचे जाळे आणि त्यामागील आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जात आहे. या कारवाईत गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Relations : तब्बल ३ वर्षांनी पाकिस्तानी मंत्री भारतात येणार! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदाच मोठी घडामोड; दिल्लीत नेमकं काय घडतंय?

व्होट चोर, गद्दी छोड! काँग्रेसच्या भारत समिटमध्ये इटलीच्या नेत्यानं दिली घोषणा, नेमकं काय घडलं?

Stray Dog Bite : मंगळवेढा शहरात भटक्या कुत्राचा 12 नागरिकांना चावा

EV Bus Scooty Accident : इलेक्ट्रिक बस-स्कुटीची भीषण धडक! पैठण महामार्गावर महिलेचा बळी; दोघे गंभीर जखमी

Zapatlela Untold Story : 'तात्या विंचू' लंडनला कसा पोहोचला? सुपरहिट मराठी सिनेमाचं आणि शरद पवारांचं 'ते' खास कनेक्शन आलं समोर!

SCROLL FOR NEXT