visarjan file photo esakal
नाशिक

Nashik Ganesh Visarjan: 2 लाख गणेशमूर्तींचे संकलन; मागील वर्षाच्या तुलनेत घट

सकाळ वृत्तसेवा

Nashik Ganesh Visarjan : पर्यावरणपूरक गणेशोत्सव संकल्पना राबविण्याची घोषणा महापालिकेने केल्यानंतर त्या संकल्पनेला नाशिककरांनी या वर्षीदेखील प्रतिसाद दिला. गेल्यावर्षी गणेशोत्सवात दोन लाख सहा हजार गणेशमूर्ती दान करण्यात आल्या होत्या. या वर्षी दोन लाख २५३ मूर्तींचे संकलन करण्यात आले.

मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी मुर्ती संकलनात घट झाली असली तरी त्यामागे पीओपी मूर्तीवरील बंदीचा दावा करण्यात आला आहे. निर्माल्य संकलनातदेखील मागील वर्षाच्या तुलनेत वाढ झाली असून, या वर्षी २५३ मेट्रीक टन निर्माल्य संकलित करण्यात आले. (Nashik Ganesh Visarjan Collection of 2 Lakh Ganesha idols decrease compared to previous year)

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने महापालिकेकडून विविध उपक्रम राबविण्यात आले. उपक्रमाचा एक भाग म्हणून नदीपात्राचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन करण्यात आले.

मुर्ती दान व विसर्जनासाठी महापालिकेकडून २७ पारंपरिक स्थळांसह ५६ कृत्रिम तलावांची व्यवस्था केली होती. मूर्ती संकलन केंद्रांवर निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.

महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देताना विसर्जनाच्या दिवशी दोन लाख २५३ मूर्ती संकलित करण्यात आले. संघर्ष करिअर अकादमी, बिटको कॉलेज, एनसीसी कॅडेट्स, सह्याद्री प्रतिष्ठान, के. व्ही. एन. नाईक कॉलेज, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, के. के. वाघ अभियांत्रिकी कॉलेज, एनडीएमव्हीपी कॉलेज, संदीप फाउंडेशन, महावीर पॉलिटेक्निक, स्वप्नपूर्ती फौंडेशन, रोटरी क्लब आदींनी मुर्ती व निर्माल्य संकलनात मदत केली.

उपायुक्त श्रीकांत पवार, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा शहर अभियंता शिवकुमार वंजारी, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, सचिन जाधव, जितेंद्र पाटोळे, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ.आवेश पलोड, विभागीय अधिकारी योगेश रकटे, राजाराम जाधव, विभागीय स्वच्छता निरीक्षक दराडे, नवनीत भामरे, समीर रकटे यांनी प्रयत्न केले.

विसर्जन ठिकाणांहून एकूण १५३ मेट्रीक टन निर्माल्य संकलित करण्यात आले. महापालिकेकडून नागरिकांना विसर्जनासाठी ९५३. ५ किलो अमोनिअम बायकार्बोनेट पावडरचे वाटप करण्यात आले होते. मागील वर्षी १४४ मेट्रीक टन निर्माल्य संकलन करण्यात आले होते.

विभागनिहाय मुर्ती संकलन

पंचवटी - ७७,३२९

सिडको- २४,६१६

नाशिकरोड- ४२,०९६

पूर्व- १४,७६५

सातपूर- ३०,३३०

पश्चिम- ११,११७

-----------------------

एकूण- दोन लाख २५३

विभागनिहाय निर्माल्य संकलन

विभाग संकलन (टनांत)

पंचवटी ५२.४७५

नाशिक रोड १८

सिडको २५.२३०

पश्चिम १८.१३५

पूर्व १५.१५५

सातपूर २४.१६०

------------------------------

एकूण १५३.१५५

अमोनिअम बायकार्बोनेट पावडर वाटप

विभाग किलो

पंचवटी २६३

नाशिक रोड १३५

सिडको ३२५

पश्‍चिम ११६

पूर्व २७.५

सातपूर ८७

----------------------------------

एकूण ९५३.५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT