A gang of bogus sureties was arrested from a lodge on Nashik Road. esakal
नाशिक

Nashik Crime News : आरोपींना बोगस जामीन करून देणारी टोळी जेरबंद

Nashik News : आरोपींना न्यायालयातून जामीन मिळवून देण्यासाठी बोगस कागदपत्रे तयार करून बोगस जामीनदारांना हजर करीत जामीन मिळवून देणारी टोळीच पोलिसांच्या हाती लागली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर-जिल्ह्यामध्ये विविध पक्षांच्या नेत्यांच्या सभा होत असल्याने या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार, शहरातील हॉटेल्स, लॉजची तपासणी करताना, विविध गुन्ह्यातील आरोपींना न्यायालयातून जामीन मिळवून देण्यासाठी बोगस कागदपत्रे तयार करून बोगस जामीनदारांना हजर करीत जामीन मिळवून देणारी टोळीच पोलिसांच्या हाती लागली आहे. (gang that give fake bail to accused was arrest)

नाशिक रोड पोलिस ठाण्यातील दहशतवाद विरोधी पथकाने या टोळीला जेरबंद केले असून, याप्रकरणी नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. अवदेश नारायण रामाधर उपाध्याय (४१, रा. आडगाव), नितीन नाथा महाले (३८), अरुण पंजाबराव गरुड (४५), सचिन कैलास शिरसाठ (३८, सर्व रा. नाशिक रोड) अशी संशयितांची नावे आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहर पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी करडी नजर ठेवून तपासणी केली जात आहे. नाशिक रोड पोलिस ठाण्यातील दहशतवाद विरोधी पथकाचे अंमलदार संदीप पवार, हेमंत मेढे, राहुल मेहेंदळे हे मंगळवारी (ता.१४) नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरातील हॉटेल्स व लॉजची तपासणी करीत होते.

परिसरातील साई लॉजमध्ये तपासणी सुरू असताना, एका रुममध्ये थांबलेल्या चौघांची चौकशी सुरू होती. त्यावेळी पोलिसांना त्यांच्याकडील कागदपत्रांवरून संशय आला. त्यांची कसून चौकशी करीत त्यांच्याकडील कागदपत्रांची व सामानाची झडती घेतली असता, धक्कादायक कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागले. (latest marathi news)

संशयित उपाध्याय याच्याकडे स्वत:चा फोटो असलेले मात्र वेगवेगळ्या नावांचे तीन आधारकार्डसह अनेक बनावट कागदपत्रे सापडली. तर अन्य संशयितांकडेही बनावट रेशनकार्ड, महसुल विभागाचे बनावट शिक्के असे साहित्य मिळून आले. चौकशीनंतर त्यांनी संशयित राकेश बाळू जाधव, प्रमोद प्रल्हाद नार्वेकर.

दविद लमूवेल गायकवाड याच्याकडून बनावट आधारकार्ड, रेशनकार्ड तयार करून घेतल्याचे सांगितले. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी, नाशिक रोडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी हे तपास करीत आहेत.

बोगस जामीन उघड

न्यायालयांमध्ये बोगस जामीनदार उभे करून आरोपींना जामीन मिळवून दिला जातो, अशी ओरड नेहमीच होते. परंतु अशी बोगस जामीनदारांची टोळी पहिल्यांदाच जेरबंद झाली आहे. संशयित हे बनावट आधारकार्डसह रेशनकार्ड व अन्य कागदपत्रे फौजदारी खटल्यातील आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी न्यायालयात बोगस नावाने हजर केले जातात. यामागे मोठे रॅकेट न्यायालयात चालते असे नेहमीच बोलले जाते. यात कायद्याची माहिती असणाऱ्यांचा मोठा हात असल्याचे सांगितले जाते. या निमित्ताने ही बाब उघड झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

Khandala Accident : खंडाळा घाटात भीषण अपघात; भरधाव टेम्पोचे नियंत्रण सुटले; ५ वाहनांना धडक; ट्रॅफिक अर्धा तास ठप्प!

SCROLL FOR NEXT