Nashik Crime News  esakal
नाशिक

Nashik Crime News : महात्मानगरमध्ये कॅफेत हुक्का पार्लर गंगापूर पोलिसांची धाड : मुद्देमाल जप्त; दोघांविरोधात गुन्हा

Nashik News : महात्मानगर परिसरातील कॅफेमध्ये चोरीछुप्यारितीने सुरू असलेल्या बेकायदेशीर हुक्का पार्लर सुरू असल्याचे आढळून आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महात्मानगर परिसरातील कॅफेमध्ये चोरीछुप्यारितीने सुरू असलेल्या बेकायदेशीर हुक्का पार्लर सुरू असल्याचे आढळून आले आहे. गंगापूर पोलिसांनी सदरील कॅफेवर छापा टाकून कारवाई करीत दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, ३८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. (Gangapur Police Raid in cafe Hookah Parlours in Mahatma Nagar)

पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात अद्यापही चोरीछुप्यारितीने बेकायदेशीररित्या हुक्का पार्लर सुरू असल्याचे अधोरेखित झाले आहे. हार्दिक अतुल आहिरे (२५, रा. अभिनव रिव्हर व्हयु, समर्थनगर, काठेगल्ली, द्वारका), कल्पेश सुभाष गांगुर्डे (३८, रा. प्रियतमा अपार्टमेंट, स्नेहनगर, म्हसरुळ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलीस अंमलदार गणेश रहेरे यांच्या फिर्यादीनुसार, महात्मानगर येथील भोसला मिलिटरी स्कुलच्या गेटजवळ असलेल्या १२ टू १२ कॅफे याठिकाणी बेकायदेशीररित्या हुक्का पार्लर सुरू असल्याची खबर मिळाली होती. (latest marathi news)

त्यानुसार गंगापूर पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी (ता. ५) या कॅफेवर छापा टाकला असता, त्यावेळी बेकायदेशीररित्या हुक्का पार्लर सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी कॅफेतून साडेचार हजार रुपयांचे तीन हुक्का पॉट यासह ब्रेन फ्रिजअप फ्लेवर.

लश आईस फ्लेवर, केवा थ्री पान फ्लेवर या प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थांसह साहित्य असा ३८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसात दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यता आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha : भाजपचे राज्यसभेचे उमेदवार ठरले, १० नेत्यांची नावे चर्चेत; यादी दिल्लीला पाठवली, कुणाला संधी?

Krishnaraj Mahadik Political Journey : स्पोर्ट्समन, युट्यूबर ते राजकारणी खासदार धनंजय महाडिक पुत्र कृष्णराजचा राजकीय प्रवास

Latest Marathi News Live Update : लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले

पवारांच्या राज्यसभेसाठी लेकीची फिल्डिंग! संजय राऊतांशी चर्चा, खर्गे आणि उद्धव ठाकरेंना भेटणार सुप्रिया सुळे

Toll tax on Indian Army: भारतात सैनिकांना टोल टॅक्समधून सूट मिळते का? जाणून घ्या नियम काय सांगतो

SCROLL FOR NEXT