Gangotri Accident Case esakal
नाशिक

Gangotri Accident Case: नाशिकचे 28 भाविक सुखरूप; गंगोत्री मार्गावर दरड कोसळून एक ठार

Nashik News : चारधाम परिसरातील गंगोत्री दर्शनासाठी जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळून झालेल्या दूर्घटनेमुळे एका भाविकाचा मृत्यु झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : चारधाम यात्रेसाठी सध्या भाविकांची उत्तर भारतातील तीर्थस्थळांवर गर्दी आहे. या परिसरातील गंगोत्री दर्शनासाठी जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळून झालेल्या दूर्घटनेमुळे एका भाविकाचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक खोळबंली होती. यातून नाशिकमधून गेलेले २८ प्रवासी सुखरूप आहेत. (Nashik Gangotri Accident Case 28 Devotees of city Safe)

गेल्या महिनाभरापासून चारधाम यात्रेला प्रारंभ झाला आहे. यावेळी भाविकांची संख्या मोठ्या संख्येने वाढलेली आहे. त्यामुळे गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ याठिकाणी जाण्यासाठी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत. त्यातच भाविकांची वाहने गंगोत्रीकडे जात असताना, हर्षल या गावानजिक दरड कोसळल्याची घटना घडली. (latest marathi news)

यात एका वाहनांचे नुकसान होऊन एक जण ठार झाल्याचे समजते. या दूर्घटनेमुळे गंगोत्री मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यात नाशिकच्या २८ भाविकांना घेऊन जाणारे वाहनही अडकले होते. परंतु लष्कराच्या जवानांनी मेहनत घेऊन रस्ता मोकळा करून दिल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. यातून नाशिकचे २८ भाविकांही सुखरूपपणे पोहोचले असल्याचे तान या पर्यटन संस्थेचे अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी सांगितले आहे.

"गंगोत्री मार्गावरील हर्षल यागावी दरड कोसळल्याची घटना घडली. मात्र यात नाशिकचे भाविक सुखरूप आहेत. उद्या भाविक पुन्हा पुढच्या प्रवासाला मार्गस्थ होतील."

- दत्ता भालेराव, अध्यक्ष, तान पर्यटन संस्था.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

SCROLL FOR NEXT