fire garbage sakal
नाशिक

नाशिक : एमजी रोडवर 'कचऱ्यास' आग

अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी पोचत आगीवर नियंत्रण मिळविले

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहराच्या मध्यवर्ती भागातील महात्मा गांधी रोड परिसरात सोमवारी दुपारी मोकळ्या भूखंडावरील कचऱ्याला आग लागली. या वेळी अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी पोचत आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या ठिकाणी मोबाईल दुकानदारांकडून टाकलेल्या कचऱ्यामध्ये बॅटरी असल्याने त्याचा स्फोट होऊन ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज विभागाने व्यक्त केला.

महात्मा गांधी रोडवरील मोबाईल दुरुस्ती व स्पेअर पार्ट विक्री करणारे मोठे मार्केट आहे. येथे दुकानदारांकडून जवळच असलेल्या जिल्हा परिषदेच्या मोकळ्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात मोबाईलचे जुने कव्हर, खराब झालेले चार्जर, नादुरुस्त बॅटऱ्या, वायर आदींसह इतर स्पेअर पार्ट, असा कचरा फेकण्यात येत असतो. सोमवारी दुपारी बाराला या कचऱ्यातून धूर निघाला असता, अग्निशमन विभागाने पाणी मारले. त्यानंतर दुपारी अडीच ते तीनला अचानक मोठी आग लागली. त्यानंतर अग्निशमन विभागाला पुन्हा बोलविण्यात आले.

त्यांनी काही वेळातच ही आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाने केलेल्या पाहणीत या ठिकाणी मोबाइल बॅटऱ्या मोठ्या प्रमाणात असल्याचे आढळून आले. कोरड्या कचऱ्याला सुरवातीला आग लागून बॅटरीचा स्फोट झाल्याने आग वाढल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. त्यानंतर येथील दुकानदारांना या ठिकाणी मोबाईल संबंधी असलेला कचरा न टाकण्याचे आवाहन केले. आग विझविण्यासाठी वरिष्ठ फायरमन श्री. राऊत यांच्यासह भीमाशंकर खोडे, दिनेश लासुरे, नाना गांगुर्डे, चालक जयंत सात्रस यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Oil Crisis: पाकिस्तानात पेट्रोल साठ्यावरून नवा वाद! शहबाज सरकारच्या दाव्यांची पोलखोल; फक्त इतक्या दिवसांचा स्टॉक शिल्लक...

बाबो! प्रीती झिंटानं 'इतक्या' कोटींना विकला ब्रांद्यामधला अलिशान फ्लॅट, किंमत एकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल

Latest Marathi News Live Update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 24 मार्च रोजी होणार

T20 World Cup 2026: सर्वाधिक धावा, सर्वाधिक विकेट्स कोणाच्या नावावर? अव्वल ३मध्ये भारतीय बॅटर नाही, गोलंदाजांत एक गडी

US-Israel-Iran War: एकमेकांवरील हल्ले अजूनही सुरूच; मृतांची संख्या चौदाशेहून अधिक, इराणमध्ये मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT