During the meeting held in Zilla Parishad on Tuesday Chief Executive Officer Ashima Mittal, District Health Officer Dr. Sudhakar More, esakal
नाशिक

Nashik Malnutrition Relief : कुपोषणमुक्तीसाठी प्रत्येक तालुक्यात आता किलबिल मेळावे!

Nashik News : कुपोषित बालके शोधण्यासाठी धडक मोहीम सुरू आहे. ही मोहीम राबविताना प्रत्येक कुपोषित बालकापर्यंत पोचावे, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : कुपोषणमुक्तीसाठी सुरगाणा तालुक्यात राबविण्यात आलेल्या किलबिल मेळाव्याचे परिणाम दिसू लागले आहेत. यात कुपोषित बालकांचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे. त्यासाठी आता प्रत्येक तालुक्यात सुरगाण्याच्या धर्तीवर किलबिल मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे. कुपोषित बालके शोधण्यासाठी धडक मोहीम सुरू आहे. (Gather in every taluka for malnutrition relief)

ही मोहीम राबविताना प्रत्येक कुपोषित बालकापर्यंत पोचावे, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा व तालुकास्तरीय यंत्रणेची मंगळवारी (ता. २) संयुक्त आढावा मित्तल यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीत प्रामुख्याने कुपोषणावर चर्चा झाली.

कुपोषित बालके शोधून काढण्यासाठी धडक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत गृहीभेटी द्याव्यात, प्रत्येक कुपोषित बालकांचे प्रोफाइल तयार करण्यात यावे, बालकांची आकडेवारी न लपविता कुपोषणाची खरी आकडेवारी समोर आणावी. आरोग्यसेविका, आशा, अंगणवाडीसेविका आयुषच्या सामुदायिक आरोग्य अधिकारी यांनी सयुक्तिक कुपोषित बालके व त्यांच्या पालकांच्या भेटी घ्याव्यात.

यात, बालकाला आवश्यक त्या आहाराबाबत मार्गदर्शन करावे. आयआयटी मुंबई यांनी कुपोषण व आरोग्यविषयक माहिती देणारे उत्कृष्ट व्हिडिओ तयार केले असून, ते सॅम बालकांच्या पालकांपर्यंत पोचविण्यात यावेत, अशा सूचना मित्तल यांनी या वेळी करत, प्रत्येक कुपोषित बालकाला कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढावे, असे आवाहन केले. (latest marathi news)

प्रत्येक तालुक्यामध्ये सुरगाणा तालुक्याने राबविलेल्या किलबिल मेळाव्याप्रमाणे सॅम बालकांच्या पालकांसाठी मेळाव्यांचे आयोजन करून त्यामध्ये आरोग्य तपासणी, आहाराबाबत मार्गदर्शन, मनरेगा जॉबकार्डबाबत मार्गदर्शन करण्याबाबत सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या.

बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. राजेंद्र बागूल यांच्यासह तालुका आरोग्याधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.

"शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर शिबिरांचे आयोजन केले जाईल." - आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamuna Expressway Accident: मध्यरात्री धुक्यात अचानक आगीचा भडका… क्षणात पेटल्या ८ बस-कार; प्रवासी जीवंत जळाले... रात्रीचा थरारक क्षण

Solapur Crime:'विद्यार्थिनींवर अत्याचार करणारा शिक्षक बडतर्फ'; वर्गात सीसीटीव्ही कॅमेरा, जन्मठेपेची शिक्षा अन्..

राज्य सरकारचा माेठा निर्णय! 'गुन्हा लपविल्यास मुख्याध्यापकासह व्यवस्थापनाविरुद्धही गुन्हा'; जबाबदारी केली निश्‍चित..

मोठी बातमी! कमी पटाच्या झेडपी शाळांवर कंत्राटी शिक्षक; ७० वर्षांपर्यंतच्या सेवानिवृत्त शिक्षकांची २० हजार रुपयांच्या मानधनावर होईल नेमणूक

Pune News : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करून पुण्याला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्याचा उपक्रम; शहराच्या सर्वांगीण विकासावर फडणवीसांचा जोर!

SCROLL FOR NEXT