नाशिक

मुलींच्या स्वागतासाठी बदलतेय समाजाची मानसिकता

CD
मुलींच्या स्वागतासाठी बदलतेय समाजाची मानसिकता --- जिल्ह्यात चार वर्षांत ३५ अनाथ बालिकांना मिळाले हक्काचे पालक सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १० : ‘वंशाचा दिवा मुलगाच हवा’ हा पारंपरिक हट्ट मागे पडत असून, दत्तक प्रक्रियेत मुलींना स्वीकारण्याचा पालकांचा कल वाढत आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत ३५ अनाथ बालिकांना हक्काचे पालक मिळाले. नव्या कुटुंबातील प्रेम, सुरक्षितता आणि आधारामुळे या बालिकांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली आहे. ‘मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे दुसऱ्याचे धन’ अशा रूढ समजुतींमध्ये अडकलेल्या समाजाच्या मानसिकतेत हळूहळू बदल होत आहे. मुलींचे शिक्षण, स्वावलंबन आणि समान हक्कांविषयी जागरूकता वाढत असताना दत्तक प्रक्रियेतही त्याचे प्रतिबिंब दिसत आहे. मात्र, तिसरी मुलगी जन्माला आल्याने तिला सोडून देणे किंवा कौटुंबिक दबावातून नवजात बालिकेचा त्याग करणे, अशा घटना अद्याप घडतात. अशा बालिकांना दत्तक प्रक्रियेतून प्रेमळ कुटुंब आणि सुरक्षित भविष्य मिळण्याची संधी उपलब्ध होते. मुलींना स्वीकारण्याची मानसिकता अपत्यप्राप्तीची इच्छा, मूल नसणे किंवा एकाच अपत्यावर कुटुंब मर्यादित ठेवण्याचा निर्णय अशा विविध कारणांमुळे दत्तक घेण्याकडे पालकांचा कल वाढत आहे. या प्रक्रियेत मुलींनाही स्वीकारले जात असल्याने त्यांना कुटुंबाचा आधार मिळण्याबरोबरच समाजातील बदलत्या दृष्टिकोनाची प्रचीती येत आहे. पालकांची कसून पडताळणी दत्तक प्रक्रियेत बालकाची जबाबदारी सोपविण्यापूर्वी इच्छुक पालकांची सविस्तर पडताळणी केली जाते. त्यांची मानसिक तयारी, आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक वातावरण आणि बालकाच्या संगोपनाची क्षमता यांचा विचार केला जातो. या प्रक्रियेनंतरच नियमानुसार दत्तक देण्याचा निर्णय घेतला जातो. बाळासाठी चार वर्षांची प्रतीक्षा दत्तक प्रक्रियेतील नियम आणि ऑनलाइन नोंदणीमुळे इच्छुक पालकांना नियोजित प्रक्रियेतून जावे लागते. नोंदणी केल्यावर बालक दत्तक मिळण्यासाठी साडेतीन ते चार वर्षांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दत्तक घेण्याची इच्छा असलेल्या पालकांना संयम राखावा लागतो. दरम्यान, दत्तक प्रक्रियेतून बालिकांना हक्काचे घर मिळणे ही त्यांच्यासाठी सुरक्षित, सन्मानपूर्ण आणि उज्ज्वल भविष्याची आशा ठरत आहे. दत्तक गेलेले बालक वर्ष..........मुली..........मुले २०२२-२३..........०८..........०८ २०२३-२४..........०७..........०७ २०२४-२५..........१३..........०९ २०२५-२६..........०७..........०७ एकूण..........३५..........३१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT