नाशिक

नाशिक हळहळलं! शाळेत चक्कर येऊन पडल्यानं सहावीतील विद्यार्थीनीचा मृत्यू

Nashik Girl Death: सकाळी ८ वाजता शाळेत आली होती मात्र तिला त्रास होऊ लागला व ती बेंच वरून खाली पडली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शाळेत अचानक चक्कर येऊन पडल्यानं सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पण तिला नेमका त्रास काय झाला? हे अद्याप कळू शकलेलं नाही. नाशिकच्या सिडको परिसरातील खासगी शाळेत हा प्रकार घडला आहे. (Nashik Latest News)

पोलिसांच्या माहितीनुसार, दिव्या त्रिपाठी (वय ११) असं या विद्यार्थीनीचं नाव असून ती सहावीत शिकत होती. सोमवारी सकाळी ८ वाजता तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शाळेत बेंचवर बसलेली असताना तिला अचानक चक्कर आली आणि ती बेंचवरुन खाली पडली. त्यानंतर तिला तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  

दिव्या ही उंटवाडी येथील जगताप नगर परिसरात राहते. शाळेचे शिक्षक चैताली चंद्रात्रे आणि वडील प्रतेश त्रिपाठी यांनी तिला उपचारासाठी नाशिकमधील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकलेलं नाही.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT