नाशिक

यजमान नाशिक जिल्हा संघ विजेता

CD
पान चार ॲंकर 33690 नाशिक: केटीएचएमच्या क्रीडांगणावर आयोजित आंतरविभागीय मुलींच्या हॅण्डबॉल स्पर्धेतील विजेत्या संघाच्या सत्काराप्रसंगी उपस्‍थित मान्‍यवर. यजमान नाशिक जिल्हा संघ विजेता पुणे शहर उपविजेते; मुलींच्या हॅण्डबॉल स्पर्धेतील कामगिरी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २७ः मविप्र संस्‍थेच्‍या केटीएचएम महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर दोन दिवसीय आंतरविभागीय मुलींच्या हॅण्डबॉल स्पर्धा झाल्‍या. या स्‍पर्धेत यजमान नाशिक जिल्‍हा संघाने विजेतेपद पटकावले. तर पुणे शहर संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्‍पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी (ता.२७) पार पडला. अंतिम लढीतीत नाशिक जिल्ह्याच्या संघाने आक्रमक खेळ करत पुणे शहर संघावर १७ -१५ अशा दोन गुणांनी विजय मिळवला. तृतीय क्रमांकाच्या लढतीत पुणे जिल्हा संघाने अहिल्यानगर संघावर एकतर्फी मात केली. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पुणे शहर संघाची तेजश्री निकते हिला अनिल धुमणे यांच्यातर्फे स्वर्गीय सुनील धुमणे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रोख पारितोषिक दिले. नाशिक जिल्हा संघाची खेळाडू कांचन बागुलला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलरक्षक म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू डॉ. सुनील मोरे, मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, केटीएचएम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कल्पना अहिरे, नाशिक विभाग सचिव चेतन आव्हाड, विद्यापीठ प्रतिनिधी डॉ. रोशनी गुजराती यांच्या उपस्थितीत झाला. मविप्र सरचिटणीस ॲड.ठाकरे म्‍हणाले, की आजच्या धावपळीच्या युगात खेळाला महत्त्व असून मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी खेळ अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनात कुठल्‍यातरी खेळात सहभागी व्‍हावे. प्रत्येकाने शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य जपणेदेखील काळाची गरज आहे. स्पर्धेतून आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संघ निवडण्यात आला. निवड समितीमध्ये डॉ. उमेश पनेरू (पुणे), डॉ. विक्रांत राजोळे (नाशिक), डॉ. मनीषा कोंढरे (पुणे) यांचा समावेश होता. गणेश कोंडे, रोहन पिंगळे, आशिष थापा, कांचन जाधव, मंगेश जगझाप, मनीष बोरस्ते यांनी पंच म्हणून काम बघितले. क्रीडा संचालक प्रा. हेमंत पाटील यांनी स्पर्धेचे संयोजन व सूत्रसंचालन केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रा. सागर कडलग, प्रा. गणपत आहेर, प्रा. पूनम महाजन, प्रा. सीमा ठाकरे, दौलत बेंडकोळी, निखिल हळदे, सुभाष उकाडे आदींनी परीश्रम घेतले. -------- या खेळाडूंनी वेधले लक्ष विजयी संघातर्फे कावेरी महाले, ऐश्वर्या पिंगळे, मानसी भोर यांनी अनुक्रमे ५, ३, ४ गोल नोंदवले. पुणे संघातर्फे योगेश्वरी जाधवने ५ गोल नोंदवून चांगली लढत दिली. नाशिकची खेळाडू कांचन बागुलचा खेळ प्रेक्षणीय ठरला. तृतीय क्रमांकाच्या लढतीत पुणे जिल्हा संघाने अहिल्यानगर संघावर २८ -१३ असा एकतर्फी विजय मिळवला. पुणे जिल्हा संघातर्फे गायत्री पानसरे, वैभवी करपे यांनी प्रत्येकी चार गोल केले. अहिल्यानगर संघातर्फे सुहानी पवार, प्रणाली बोडके यांनी अनुक्रमे ५ व ४ गोल नोंदवले.

Missile attack: सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला; येमेनमधील हूती बंडखोरांचा दावा

‘राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत, असं मला कधीच वाटलं नाही’; सोनिया गांधी यांचा मोठा खुलासा

Latest Marathi News Live Update : शेतकरी प्रोत्साहन निधीच्या प्रतीक्षेत, कर्जमाफीच्या चार याद्या जाहीर; वर्ष उलटूनही ५० हजारांची मदत खात्यात जमा नाही

Pune Crime : पंचतारांकित हॉटेलमधील हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस; मॉडेलिंग क्षेत्रातील दोन तरुणींची सुटका

CSK COACHING STAFF : IPL २०२७ आधी CSK मध्ये मोठे बदल! अल्बी मॉर्केल, गॅरेथ बॅटींची एन्ट्री; मोहित शर्माकडे गोलंदाजीची जबाबदारी

SCROLL FOR NEXT