Snakes at godaghat esakal
नाशिक

Nashik Goda Mahaarti: गोदा महाआरतीत आता विघ्न सर्पांचे! पाणवेलीबरोबरच मोठ्या प्रमाणावर वाहून आल्याने भीतीचे वातावरण

Nashik News : सायंकाळी गोदा महाआरतीत सहभाग घेणाऱ्यांसह सायंकाळी नदीकिनारी फिरायला जाणाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सध्या गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पण या पाण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर पाणवेली व त्यातून सर्प वाहून येत आहेत. त्यामुळे सायंकाळी गोदा महाआरतीत सहभाग घेणाऱ्यांसह सायंकाळी नदीकिनारी फिरायला जाणाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. (Nashik Goda Mahaarti snakes disturbing marathi news)

गोदापात्रात आवर्तनानुसार पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पाण्यात मोठ्या प्रमाणावर पाणवेली वाहून आल्या असून त्या तिसऱ्या दिवशीही गाडगे महाराज पुलालगत अडकून पडल्या आहेत. या पाणवेलींबरोबरच नदीच्या वरील भागात पाणसर्प व इतर सरपटणारे प्राणी मोठ्या प्रमाणावर वाहून आले आहेत. त्यामुळे गोदाकाठी नियमित फेरफटका मारणाऱ्यांसह या आरतीत सहभागी होणाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.

सध्या गोदा आरतीचा माहोल टिपेला पोचला असून नाशिककर भाविकांत त्याबाबत मोठी उत्सुकता आहे. याशिवाय यात्रोत्सवासाठी शहरात आलेले पर्यटक भाविकही गोदा महाआरतीत सहभाग नोंदवत असल्याने हरिद्वार, काशीसारखीच ही आरतीही भव्यदिव्य होऊ लागली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून नदीपात्रात पाणी व पाणवेलींबरोबरच मोठ्या प्रमाणावर सर्पही वाहून येत आहेत. त्यामुळे भाविकांत भितीचे वातावरण आहे. (latest marathi news)

मुलीला सर्पदंश

मध्यंतरी परराज्यातून आलेल्या एका भाविकांच्या मुलीला नदीपात्रात सर्पदंश झाल्याची माहिती पुरोहितांनी दिली. या मुलीला सर्पदंश झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या मुलीचे पुढे काय झाले हेही गुलदस्त्यातच आहे. मात्र पाण्यातील सर्पांची धास्ती अनेकांनी घेतली आहे, हे या भागात फेरफटका मारला असता जाणवते.

"सध्या गोदा महाआरतीला मोठी गर्दी उसळत आहे. परंतु दहा दिवसांपूर्वी सोडलेल्या पाण्यातून मोठ्या प्रमाणावर सर्प वाहून येत असल्याने भाविकांत भितीचे वातावरण आहे. त्यासाठी उपाययोजना व्हावी."- प्रतीक शुक्ल, गंगा गोदावरी पुरोहित संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Deepke: महायुतीचे नेते अभिजीत दीपकेंचे फॅन; भेटीसाठी गर्दी, आंदोलनाच्या भूमिकेचे कौतुक करत सुरक्षेचीही मागणी

Latest Marathi News Live Update : बाळापूर तालुक्यातील मन, निर्गुणासह महेश या तिन्ही नद्यांना मोठा पूर; धोक्याची पातळी ओलांडली

Radhanagari Dam Gate Opened : राधानगरी धरण 100 टक्के भरले! मध्यरात्री 6 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला; भोगावती नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

वर्षा ऋतू आणि वातदोषांचे संतुलन

Bhiwandi Building Collapse : भिवंडीत भीषण दुर्घटना! चार मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT