Godaghat
Godaghat esakal
नाशिक

Nashik News : तृणधान्याच्या महारांगोळीने सजणार गोदाघाट! गुढीपाडवा अन हिंदू नववर्षानिमित्त एप्रिलमध्ये सांस्कृतिक सोहळा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गुढीपाडवा आणि हिंदू नववर्ष यानिमित्ताने दरवर्षी गंगाघाटावर सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदा राष्ट्रीय विकास मंडळ, गुणगौरव न्यास व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव होत आहे. (Nashik Godaghat will decorated with Rangoli of cereals marathi news)

पाडवा पटांगण (जुना भाजी बाजार) येथे गोदावरी तीरावर ५ ते ८ एप्रिल दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात सहा हजार चौरस फुटांची महारांगोळी, महावादन, अंतर्नाद, युद्धकला प्रात्यक्षिक, शोभायात्रा असे विविध कार्यक्रम होतील. यानिमित्ताने महारांगोळी उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व सुप्रसिध्द रांगोळी कलाकार नीलेश देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली आरती गरुड, सुजाता कापुरे, मयुरी शुक्ला व १०० सहकारी महिला ७५ फूट लांब व ७५ फूट रुंद आकारात रांगोळी रेखाटतील.

यात वापरलेली तृणधान्ये नंतर स्वच्छ करून गरजूंना देण्यात येतील. रांगोळी हे भारताच्या सांस्कृतिक परंपरेचं एक अनन्यसाधारण वैशिष्ट्य असून मूळ ६४ कलाप्रकारांमध्ये गणना होते, इतका जुना हा कलाप्रकार आहे.

महाराष्ट्रासह १५ राज्यांत आजही रांगोळीची समृध्द परंपरा टिकून आहे. या कला प्रकाराचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून रांगोळी रेखाटण्यात नीलेश देशपांडे यांनी संस्कार भारतीच्या माध्यमातून अखंड योगदान दिले आहे. रांगोळी परंपरेचे ते जतन, संवर्धन करत आहेत. सन ११३०च्या सुमारास राजा सोमेश्वराने प्रथम रांगोळीविषयी लिहिलं आहे.

त्याच्या मते विद्ध, अविद्ध, भाव असे चित्रांचे तीन प्रकार पडतात. नारदसंहितेमध्ये चित्रांचे तीन प्रकार म्हटले आहेत. भौम्य - भूमीवरचा, कुड्यक - भिंतीवरचा आणि ऊर्ध्वक - छतावरचा. त्यातली भौम्य म्हणजे भूमीवरची चित्रकला. (latest marathi news)

त्यामध्ये रांगोळी येते. रांगोळीचे रसचित्र आणि धूलिचित्र असे दोन प्रकार सांगितले आहेत. बंगाल, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ हा जो सगळा पूर्व किनारपट्टीचा भाग आहे, तिथे तांदूळ भिजत घालून त्याची बारीक पूड करून काडीला कापूस लावून रांगोळ्या काढल्या जातात.

स्वस्तिमधून रांगोळी विकसित

मांगल्य आणि सौंदर्य याचं प्रतीक म्हणजे रांगोळी, असे मानले जाते. भारतात यज्ञसंस्थेचा जन्म झाला, तेव्हापासून रांगोळीची परंपरा आहे. तेव्हा तिला रांगोळी असं संबोधन नसलं, तरी यज्ञाभोवती रांगोळी काढली जायची.

तिसऱ्या शतकात पौष्कर संहितेमध्ये लिखित स्वरूपात प्रत्यक्ष रांगोळीचे नाही, पण मंडलांचे (पद्मोदर) उल्लेख आढळतात. यज्ञ, बिंब, कुंभ आणि मंडल अशा चार मार्गांपैकी मंडलपूजा आज तितकीशी प्रचलित नसली, तरी त्यातल्या भद्र आणि स्वस्ति या कल्याणकारी रचनांमधूनच रांगोळी विकसित होत गेली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT