Godavari Gaurav Award organized by Kusumagraj Foundation at Gurudakshina Auditorium esakal
नाशिक

Nashik Godavari Gaurav Award : सर्व कलांमध्ये साहित्यकला सर्वश्रेष्ठ : न्या. नरेंद्र चपळगावकर

Nashik News : कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून आयोजित गोदावरी गौरव पुरस्कार वितरणप्रसंगी अध्यक्षस्थानावरून गुरुदक्षिणा सभागृहात ते बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जीवनाचा ताबा आज राजकारणाने घेतला आहे. त्यामध्ये कला, साहित्य, क्रीडा, नृत्याला जागा नाही. कला टिकविण्याच्या परंपरा हळूहळू लुप्त होत आहेत. एकता राखण्यासाठी, कलावंताला व्यक्त होण्यासाठी तिचे स्वातंत्र्य जपले पाहिजे. काळ केव्हाही बदलू शकतो म्हणून प्रेम सांस्कृतिक क्षेत्रात जपले पाहिजे आणि त्यासाठीच सर्व कलांमध्ये साहित्यकला श्रेष्ठ मानली जात असल्याचे मनोगत न्या. नरेंद्र चळगावकर यांनी व्यक्त केले. (Nashik Godavari Gaurav judge Award Narendra Chapalgaonkar statement Best in Literature in All Arts marathi news)

कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून आयोजित गोदावरी गौरव पुरस्कार वितरणप्रसंगी अध्यक्षस्थानावरून गुरुदक्षिणा सभागृहात ते बोलत होते. सहा वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवरांना यावेळी २१ हजार रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. पुरस्काराला उत्तर देताना आशुतोष गोवारीकर म्हणाले की, प्रेक्षक नेहमी सच्चे असतात.

फिल्म इंडस्ट्रीसाठी हा आव्हानात्मक काळ आहे. बदलत्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे जगभरात तारांबळ उडाली आहे. परंतु यातूनच नवीन आविष्कार घडेल आणि प्रेक्षकांची मने जिंकता येतील. डॉ. शमसुद्दिन तांबोळी यांनी मुस्लिम समाज मागे पडला आहे. त्याच्या प्रबोधनासाठी फार प्रयत्न होत नाहीत.

त्यांना धर्माची झालर न लावता त्यांच्याकडे माणूस म्हणून बघा. समाज सध्या कोषात गेला आहे. तो शांत राहून समजूतदारपणा दाखवावा की शरणागती पत्करावी, अशा कोंडीत सापडला आहे. त्यासाठी समान नागरी कायदा गरजेचा असल्याचे त्यांनी नमूद केले. (Latest Marathi News)

यावेळी व्यासपीठावर कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अरविंद ओढेकर, प्रकाश होळकर, ॲड. अजय निकम, गुरमित बग्गा, सिसिलिया कार्व्हालो, संजय पाटील उपस्थित होते. मकरंद हिंगणे यांनी प्रास्ताविक तर स्वानंद बेदरकर यांनी सूत्रसंचालन केले.

गोदावरी गौरवचे मानकरी

डॉ. शमसुद्दिन तांबोळी (लोकसेवा)

विवेक सावंत (ज्ञान)

प्रमोद कांबळे (शिल्प)

डॉ. सुचेता भिडे-चापेकर (नृत्य)

आशुतोष गोवारीकर (चित्रपट)

सुनंदन लेले (क्रीडा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Zodiac Prediction 7 to 13 July: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Viral Video : सुनेची आईसोबत मिळून सासुला बेदम मारहाण; झिंज्या पकडल्या, उचलून आपटलं अन्... व्हिडिओ व्हायरल

CA Result Success Story: अभ्यासातील सातत्य, जिद्दीच्या बळावर साकारले स्वप्न; राजनवर कौतुकाचा वर्षाव; सीए परीक्षेत ६०० पैकी मिळविले ५१६ गुण

SCROLL FOR NEXT