felicitation of sanity workers esakal
नाशिक

Nashik News : सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा

Nashik News : त्यांच्या या प्रामाणिकपणा बद्दल गुरुवारी (दि.२५) पंचवटी पोलिसांकडून सन्मानित करण्यात आले असून, यासह महानगरपालिकेतर्फे प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी : शहरासह परिसरातील स्वच्छता करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने स्वच्छता कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. मंगळवारी (दि.२३) तपोवन कॉर्नर येथील जी टी टायर्स येथे एका महीला स्वच्छता कर्मचाऱ्याला तुटलेले सोन्याचे मंगळसूत्र सापडले. त्यांनी पंचवटी पोलिस ठाणे गाठले अन् ते मंगळसूत्र पोलिसंच्या स्वाधीन केले.

त्यांच्या या प्रामाणिकपणा बद्दल गुरुवारी (दि.२५) पंचवटी पोलिसांकडून सन्मानित करण्यात आले असून, यासह महानगरपालिकेतर्फे प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. (Gold Mangalsutra returned to owner by women sanitation workers)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवारी (दि.२१) रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास कृष्ण नगर मधील वडनेरे दाम्पत्य जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडले होते. शतपावली करत नवजीवन हॉस्पिटल समोर असलेल्या जे. के. टायर्स तपोवन कॉर्नर येथून जात असताना, पाठीमागून दुचाकी वरून आलेल्या अज्ञात दोघा संशयितांनी वडनेरे यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची सुमारे ४५ हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन खेचून नवीन आडगाव नाक्याच्या दिशेने पोबारा केला.

या घटनेची माहिती वडनेरे दांपत्याने पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असताना, मंगळवारी (दि.२३) तपोवन कॉर्नर येथील जी टी टायर्स येथे मनपाच्या पंचवटी विभागीय कार्यालयातील महीला स्वच्छता कर्मचारी अर्चना सचिन गांगुर्डे साफ सफाई करत असताना त्यांना तुटलेले सोन्याचे मंगळसूत्र सापडले. (latest marathi news)

त्यांनी ते पंचवटी पोलिस ठाण्यात जाऊन जमा केले. अर्चना गांगुर्डे यांच्या या प्रामाणिकपणा पाहून गुरुवारी (दि.२५) पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड व पोलिस निरीक्षक प्रशासन सुशील जुमडे, पोलिस निरीक्षक ज्योती आमने यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी नाशिक महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ.आवेश पलोड, पंचवटी विभागाचे विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, स्वच्छता निरीक्षक राकेश साबळे, दीपक चव्हाण यांचे तर्फे प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी वडनेरे दाम्पत्य देखील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT