Gold Silver Rate esakal
नाशिक

Gold Silver Rate : वर्षभरात सोन्याचे भाव लाखावर जाण्याचा अंदाज

Nashik News : सोने गुंतवणुकीकडे लोकांचा कल वाढल्याने हे भाव येत्या वर्षभरात लाखाच्या घरात जाण्याचा अंदाज सराफ व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गुंतवणूक म्हणून सध्या सोने खरेदीकडे लोकांनी मोर्चा वळवला आहे. यामुळेच दोन वर्षांपूर्वी ५२ हजार रुपये असलेल्या सोन्याचा भाव आज ७२ ते ७५ हजार रुपये तोळ्यावर पोचला आहे. सोने गुंतवणुकीकडे लोकांचा कल वाढल्याने हे भाव येत्या वर्षभरात लाखाच्या घरात जाण्याचा अंदाज सराफ व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे. नाशिक शहरात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीला अमाप उत्साह पाहायला मिळाला. (Gold prices during year Estimated to go to lakhs)

शहरातील सराफी पेठांमध्ये कोट्यवधींची उलाढाल पाहायला मिळाली. शुद्ध सोन्याचा अर्थात २४ कॅरेट भाव ७२५०० तर चांदीचा भाव ८५५०० होता. सोन्याच्या २२ कॅरेटचा भाव ६७ हजार रुपये होता. लोकांनी सकाळी दुकाने उघडल्यावर सराफी पेठांमध्ये सोने खरेदीसाठी गर्दी केली होती. येणाऱ्या काळात एक लाखापर्यंत भाव जाईल.

असा गुंतवणूक तज्ञांचा अंदाज असून बँकेतील ठेवींपेक्षा सोन्यातील गुंतवणूक वृद्धिंगत होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. जागतिक घडामोडींनी सोन्याचा भाव वधारत असून चांदीचा भाव सध्या ८५ हजार रुपये असला तरी तो येत्या दोन वर्षात दीड लाखापर्यंत जाईल. (latest marathi news)

असा अंदाज आहे. त्यामुळे सोने बाजारात सध्या नाशिकमध्ये नवचैतन्य पाहायला मिळत आहे. गुंतवणूक म्हणून बँकेतील एफडीपेक्षा सोने खरेदीकडे ग्राहक वाढल्याचे दिसून येत आहे.

"निवडणूक आणि जागतिक घडामोडी पाहता आजपर्यंतच्या अभ्यासानुसार वर्षभरात सोने एक लाख रुपये तोळ्यापर्यंत जाऊ शकते. दोन वर्षांपूर्वी ५२ हजार रुपये तोळे मिळणारे सोने आज ७५ हजारांवर पोचले आहे. यावरून वर्षभरात चांगली उलाढाल होईल, लोक गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळत आहे." - राहुल महाले, अध्यक्ष नाशिक रोड सराफ असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT