The rush to buy gold in the bullion market esakal
नाशिक

Dasara Shopping: द्राक्षनगरीत दोन कोटींची सोनेखरेदी! दसऱ्यानिमित्त बाजारपेठेत नवचैतन्य; सोने-चांदी, दुचाकी, चारचाकींची मोठी उलाढाल

Latest Dasara 2024 News : दसऱ्याच्या मुहुर्तावर पिंपळगाव शहरातील निफाड फाटा परिसरातील बाजारपेठ गर्दीनी फुलून गेली. शहरातील सराफ बाजाराला सोन्यासारखी चकाकी आली.

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत : दुष्ट प्रवृत्तीचे दहन करून चांगल्या गुणांचे संवर्धन करण्याचा संदेश देणारा विजया दशमी अर्थात दसऱ्याच्या सणानिमित्त द्राक्षनगरीच्या बाजारपेठत शनिवारी नवचैतन्य दिसून आले. साडेतीन मुहर्तापैकी एक असलेल्या विजया दशमीच्या मुहुर्तावर सोने-चांदीची बाजारपेठ, सदनिका खरेदी, गृहप्रवेश, दुचाकी, चारचाकी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तुची जोरदार खरेदी झाली.

नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याने मार्केटला मोठा बुस्टर डोस मिळाला. टोमॅटोला सोन्याचे दर येऊन शेतकऱ्यांमध्ये झालेल्या आर्थिक क्रांतीचा सकारात्मक परिणाम बाजारपेठत दिसला. (Gold purchase worth two crores in pimplegaon baswant)

तीन किलो सोन्याची विक्री

दसऱ्याच्या मुहुर्तावर पिंपळगाव शहरातील निफाड फाटा परिसरातील बाजारपेठ गर्दीनी फुलून गेली. शहरातील सराफ बाजाराला सोन्यासारखी चकाकी आली. दरवाढ परवणारी नसली तरी सोने-चांदी खरेदीला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद लाभला. दसऱ्याच्या मुहुर्तावर सोने-चांदी खरेदीची परंपरा यंदाही नागरिकांनी जपल्याने अलंकार खरेदीला गर्दी उसळली.

सोन्याचे दर ८० हजार रूपये तोळा तर चांदाचा दर ९२ हजार रूपये किलोपर्यतच्या घरात आहे. शहरातील नामांकित सुवर्णपेढ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बुकिंग झाली आहे. सराफ बाजाराला दसऱ्याचा मोठा आधार मिळाल्याचे दिसून आले. द्राक्षनगरीत एकाच दिवशी तब्बल तीन किलो सोने विक्री होऊन त्यातून दोन कोटी रूपयांची उलाढाल झाली. दिवाळी जवळ येईल तसतसा प्रतिसाद वाढत जाईल असा अंदाज विक्रेत्यांनी वर्तविला. (latest marathi news)

आटोमोबाईल क्षेत्रही धावले...

गणेशोत्सवा पाठोपाठ आटोमोबाईल क्षेत्र दसऱ्याच्या मुहुर्तावर जोरदार धावले. दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर खरेदीसाठी शोरूममध्ये मोठी गर्दी झाली. टोमॅटोला मिळत असलेल्या सरासरी एक हजार रूपये क्रेटच्या उच्चांकी दरामुळे आॅटोबाईल क्षेत्र जोरदार तेजीत आले.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या बाजारपेठला आज बूम मिळाला. विविध सवलती व आॅफर मुळे इलेक्ट्रानिक्स वस्तू खरेदीला पसंती मिळाली. टिव्ही, फ्रिज, एस.सी. अशा वस्तू नागरिकांनी दसऱ्याच्या मुहुर्तावर घरी आणल्या. पाठोपाठ बांधकाम क्षेत्राला दसऱ्यामुळे उभारी मिळाली. प्लॅट्सची चौकशी मोठ्या प्रमाणात झाल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये उत्साह दिसला.

शहरात उपनगरांमध्ये नवे गृहप्रकल्प सुरू असल्याने स्वप्नातील घरासाठी नागरिकांना चांगले विकल्प मिळाले. दरम्यान फुलासह विविध पूजेच्या साहित्यासाठी नागरिकांची निफाड फाट्यावर झुंबड उडाली होती. दसऱ्याच्या दिवशी बाजारपेठेत ग्राहक व विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर चैतन्याचे वातावरण होते.

"दसऱ्याला सकाळच्या सत्रात ग्राहकांचे प्रमाण कमी होते. दुपारनंतर सोने खरेदीला ग्राहकांची झुंबड उडाली. टोमॅटोसह शेतीमालाला चांगला दर असल्याने सराफ बाजाराला सोन्याचे दर सर्वकालीन उंचीवर असतानाही झळाळी मिळाली."

- महावीर चोपडा, संचालक, श्रीनिवास ज्वेलर्स.

"लाडकी बहिण योजनेचा सकारात्मक परिणाम बाजारपेठत आज दसऱ्याच्या निमित्ताने दिसला. महिला वर्गाने सढळ हाताने खरेदी केली." - मनोज मुथा, संचालक, छाया ज्वेलर्स.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT