suspended esakal
नाशिक

Nashik News : मद्यविक्रीचा परवाना देणारे ग्रामसेवक पाटील निलंबित! जि. प. ग्रामपंचायत विभागाची कारवाई

Nashik News : पिंपळद (ता. चांदवड) येथील ग्रामसेवक देवीदास आनंदा पाटील यांना ग्रामसभेत ठराव झालेला नसताना गावात बिअर बार, मद्यविक्री परवाना देणे भोवले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पिंपळद (ता. चांदवड) येथील ग्रामसेवक देवीदास आनंदा पाटील यांना ग्रामसभेत ठराव झालेला नसताना गावात बिअर बार, मद्यविक्री परवाना देणे भोवले आहे. कागदोपत्री ग्रामसभा दाखवून हा परवाना झाल्याचे सिद्ध झाल्याने ग्रामपंचायत विभागाने पाटील यांच्या निलंबनाचे आदेश काढले. संबंधित गावातील सरपंचांवर अपात्रता कारवाईचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. (Nashik News)

गेल्या आठवड्यात दोन ग्रामसेवकांना निलंबित केलेले असताना या आठवड्यात ही कारवाई झाल्याने ग्रामसेवकांमध्ये एकच खळबळ उडाली. सरपंचांबाबत विभागीय आयुक्तांकडून अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे. पिंपळद येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक पाटील आणि सरपंचांनी संगनमताने ग्रामसभेत ठराव झालेला नसताना गावात बिअर बार, मद्यविक्री परवाना दिल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने चांदवड गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी करून १५ फेब्रुवारीला अहवाल सादर केला होता. या अहवालाच्या आधारे विभागीय आयुक्तांकडून परवानगी मिळाल्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सुनावणी झाली. (latest marathi news)

यात, ग्रामसभेत प्रत्यक्षात असा ठराव झालेला नसताना ग्रामसेवक व सरपंचांनी कागदोपत्री हा ठराव झाल्याचे दाखवत ठराव पारित केला अन परवाना दिल्याचे निष्पन्न झाले. बिअर बार आणि मद्यविक्रीचा परवाना देण्याचा ग्रामसभेतील ठराव हा बनावट असल्याचे आणि प्रत्यक्ष ग्रामसभेत त्याबाबतचा विषयच झाला नसल्याचे नमूद असल्याचे सिद्ध झाले.

त्यावर प्रशासनाने ग्रामसेवक पाटील यांनी केवळ कागदोपत्रीच हा निर्णय घेतल्याचे सिद्ध झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. सरपंचांबाबत विभागीय आयुक्तांकडून अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT