Mango  esakal
नाशिक

Nashik Hapus Mango : द्राक्षपंढरीत फळाचा राजाचे आगमन; रत्नागिरी हापूस आंबा खातोय भाव

Nashik Hapus Mango : द्राक्षांचे आगार अशी पिंपळगाव बसवंतची सातासमुद्रापार ख्याती आहे. द्राक्षपंढरीत आता फळाचा राजा आंब्याचे आगमन झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत : द्राक्षांचे आगार अशी पिंपळगाव बसवंतची सातासमुद्रापार ख्याती आहे. द्राक्षपंढरीत आता फळाचा राजा आंब्याचे आगमन झाले आहे. द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना, आंब्याच्या हंगामाचा श्रीगणेश होत आहे. द्राक्षनगरीत सध्या रत्नागिरी हापूस आंबा भाव खात आहे. हापूसची चव चाखण्यासाठी खवय्यांना प्रतिकिलो ३०० रुपये मोजावे लागत आहेत. (Nashik grape season is in its final stage and Mango season has started)

फळांचा राजा अशी आंब्याची ओळख आहे. उन्हाळा सुरू झाल्याने रसाळ, गोड, पिवळ्या धम्मक आंब्याने बाजारात एंन्ट्री केली आहे. गावरान आंब्यांना अवकाश असला, तरी कर्नाटक, कोकणातील आंबे बाजारात आले आहेत. रत्नागिरी हापूस सर्वाधिक भाव खात आहे. प्रतिकिलोसाठी ३०० रुपये मोजावे लागत आहेत.

लालबाग, केसर, बदाम आंबे सामान्यांच्या बजेटमध्ये आहेत. लालबाग आंब्याला प्रतिकिलो १८० रुपये, तर बदाम आंब्याला १५० रुपये किलोचा भाव आहे. कोकण, कर्नाटकासह महाराष्ट्रातील लातूरचे आंबेही बाजारात दाखल झाले आहेत.(latest marathi news)

कोकणातील आंबा वाशी (नवी मुंबई)च्या बाजारातून पिंपळगावमध्ये दाखल होत आहे. उन्हाळ्यामुळे रसाळ फळांची मागणी आणि मुस्लिम समाजाचे रोजा सुरू असल्याने आंब्याना मोठी मागणी असल्याचे विक्रेते सांगतात. आंबे साठवणुकीपेक्षा ताजे बाजारात येत असल्याने ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहेत.

"उन्हाचा कडाका वाढतो तसे फळांना मागणी वाढत आहे. सण उत्सवाचे दिवस जवळ येत आहे. द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आहे. सणामध्ये आंब्याची मागणी वाढणार आहे. गुढीपाडव्यानंतर आंब्याच्या मागणीत दुप्पटीने वाढ होईल."-सचिन देव, फळ विक्रेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

Elon Musk X Chat Messaging App : इलॉन मस्कने लाँच केलं X Chat! ; आता ‘WhatsApp’ अन् ‘Arattai’ला जबरदस्त टक्कर

School Trip Rules: शिक्षकांसह विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! शैक्षणिक सहलीसाठी नवे नियम लागू

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

Numerology Predictions : 'या' तारखेला जन्मलेले लोक असतात जास्त निरोगी..वयाची साठी पार केली तर जडत नाहीत आजार

SCROLL FOR NEXT