Agriculture officials inspecting the creamsun grapes produced in farmer Kailas Waje's farm.
Agriculture officials inspecting the creamsun grapes produced in farmer Kailas Waje's farm. esakal
नाशिक

Nashik Grapes Export : खेडभैरव येथील क्रीमसन लाल द्राक्ष परदेशात; वाजे कुटुंबीयांची यशोगाथा

गौरव परदेशी

Nashik Grapes Export : येथील तीन भावंडांनी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून क्रीमसन द्राक्षांचे उत्पादन करून कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली परदेशात ती रवाना केली आहेत. अतिपर्जन्याचा इगतपुरी तालुका असल्याने द्राक्ष शेती करणे अत्यंत जिकरीचे होते. त्यावर मात करत येथील शेतकरी कैलास वाजे, संपत वाजे व नवनाथ वाजे यांनी शेतात क्रीमसन लाल द्राक्षांची लागवड करून यशस्वी उत्पादन घेतले. (Nashik Grapes Export Crimson red grapes from Khed Bhairav ​​abroad marathi news)

तालुका कृषी अधिकारी रामदास मडके, मंडल कृषी अधिकारी भास्कर गिते, कृषी पर्यवेक्षक किशोर भरते, कृषी सहाय्यक विजय कापसे, किरण सोनवणे, देवेंद्र पाटील यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. वाजे बंधूंना द्राक्षे प्रदेशात पाठविण्यासाठी लागणारे विविध परवाने मिळवून देण्यात कृषी पर्यवेक्षक किशोर भरते, विजय कापसे यांनी मदत केली. त्यांची कलर व्हरायटी द्राक्ष मोहाडी येथून परदेशात रवाना झाली. तीन वर्षांपासून अडीच एकरांत ते द्राक्ष शेती करीत आहेत.

क्रीमसन लाल द्राक्षांना यंदा प्रतिकिलो १३० रुपये भाव मिळाला. त्यांना १५ टन म्हणजे १९ लाख ५० हजारांचे उत्पादन मिळाले. द्राक्षबागेला शेणखत, रासायनिक व सेंद्रिय खते ते देतात. कैलास वाजे यांचे बी.एस्सी. ॲग्रीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १६ जणांचे कुटुंब एकत्र असून, तिन्ही भाऊ आदर्श शेती करीत आहेत. त्यांना कृषीविषयक विविध पुरस्कारही मिळाले आहेत.  (latest marathi news)

तालुक्यात वाडीवऱ्हे, मुरंबी परिसरात थॉमसन, सोनाका हिरवा रंग असलेली द्राक्षशेती केली जाते. मात्र, शेतकऱ्यांनी क्रीमसन लाल द्राक्षांची शेती केली. सुरवातीला लोकांनी त्यांना या भागात द्राक्ष शेती करणे शक्य नसल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी मेहनतीने उत्पादन मिळविले. तिन्ही भावंडे प्रगतिशील शेतकरी असून, २२ एकरांत विविध पिकेही ते घेतात.

चार एकरांत आंब्याची लागवड केली आहे. एकदा द्राक्षबाग लावल्यास पंधरा-वीस वर्षे ती चालवता येते, असे शेतकरी वाजे बंधूंनी सांगितले. त्यांना वडील गोपाळा वाजे, आई ठकूबाई व अनुसयाबाई, जयश्री कैलास वाजे, गायत्री नवनाथ वाजे आदी कुटुंबीयांची मदत होते.

''शेतीत पारंपरिक पद्धतीचा अवलंब करण्यापेक्षा आधुनिक तंत्रज्ञान व व्हरायटीचा अवलंब केल्यास निश्चितच भरघोस उत्पन्न मिळविता येते, याचा प्रत्यय आम्हाला आला. आम्ही विविध पिकांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करीत आहोत.''-कैलास वाजे, यशस्वी शेतकरी, खेडभैरव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : प्रचारसभांमध्ये ‘दोन शहजादे’, ‘मंगळसूत्र’, ‘मच्छी व मटण’, ‘भटकती आत्मा’चा बोलबाला

West Bengal EVM: मतदानकेंद्रावर धक्कादायक प्रकार! जमावाने EVM टाकले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल

Lok Sabha Election: निकालाआधीच राष्ट्रवादीला धक्का! अजित पवार यांच्या जवळच्या उमेदवारावर का दाखल झाला गुन्हा?

T20 World Cup Schedule: ‘टी-20’ वर्ल्ड कपची उत्सुकता शिगेला! अमेरिका-वेस्ट इंडीजमध्ये रंगणार थरार, पाहा संपूर्ण शेड्युल

Latest Marathi News Live Update: "आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू," राबडी देवींचा राडा

SCROLL FOR NEXT