नाशिक

कुसमाडी पॅटर्नमधून हरित नाशिक संकल्पनेला बळ

CD
फोटो : 31201 नाशिक : उन्नत नाशिक अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकांना वृक्ष व साडीचे वाटप करताना मंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके, आयुक्त मनिषा खत्री कुसमाडी पॅटर्नमधून हरित नाशिक संकल्पनेला बळ पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते अंगणवाडी सेविकांना वृक्ष व साडीचे वाटप सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २ : उन्नत नाशिक अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘हरित नाशिक, समृद्ध नाशिक’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी कुसमाडी पॅटर्न अंतर्गत राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अंगणवाडी सेविकांना वृक्ष व साडीचे वाटप करण्यात आले. ‘हरित नाशिक, समृद्ध नाशिक’ या संकल्पनेतून पर्यावरणपूरक विकासाला चालना देतानाच वृक्षलागवड आणि वृक्षांचे संगोपन याबाबत लोकसहभाग वाढविण्यावर या उपक्रमातून भर देण्यात येत आहे. मंत्री महाजन म्हणाले, पर्यावरण संवर्धन आणि वृक्षलागवडीचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी महापौर हिमगौरी आडके, आमदार देवयानी फरांदे, महापालिका आयुक्त मनिषा खत्री, अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा देखणे, नगरसेवक दिनकर पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parastoo Ahmadi : इराणमध्ये हिजाब न घालता गायले गाणे; प्रसिद्ध गायिकेला चाबकाचे ७४ फटके, प्रवासावरही बंदी

Latest Marathi News Update : पुणे शहरातील 18 हॉटेल्सचे अन्न परवाने आणि नोंदणी एफडीए निलंबित

बुद्धिबळ विश्वविजेतेपदाचा नवा अध्याय आजपासून! विद्यमान विजेत्या गुकेशसमोर जावोखिर सिंदारॉव्हचे आव्हान

Pension Life Certificate: पेन्शनधारकांनो, 30 नोव्हेंबरपूर्वी हे काम करा! घरबसल्या मोबाइलवरून जमा करा हयातीचा दाखला; पाहा प्रक्रिया

Supreme Court: हुंडा देण्याची ऐपत नसणे म्हणजे छळाचे आरोप खोटे ठरत नाहीत, पण...? सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण! हुंडा छळ प्रकरणात पती निर्दोष

SCROLL FOR NEXT