ghana oil esakal
नाशिक

Nashik News : पारंपारिक घाण्याच्या तेलाकडे वाढता कल; आरोग्याबद्दल सजगता

Nashik News : दैनंदिन आहारामध्ये तेलाशिवाय कुठलाही पदार्थ तयार होत नाही. तेलामुळे जेवणाला चव येत असली तरी अतिरिक्त सेवन केल्यास दुष्परिणामही आहे.

सकाळ वृत्तसेवा

निखिल रोकडे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : दैनंदिन आहारामध्ये तेलाशिवाय कुठलाही पदार्थ तयार होत नाही. तेलामुळे जेवणाला चव येत असली तरी अतिरिक्त सेवन केल्यास दुष्परिणामही आहे. यामुळे नैसर्गिक स्तोत्रापासून बनवलेल्या तेलास सध्या मागणी आहे. पारंपारिक काळात मिळणारे घाण्याचे तेल हे खाण्यासाठी अतिशय योग्य आहे, हे आत्ताच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळातही नागरिकांनाही कळू लागले आहे. (Growing trend towards conventional crude oil)

म्हणूनच रिफाइंड तेलापेक्षा घाण्याद्वारे काढण्यात येणाऱ्या शेंगदाणा, तीळ, करडई, सूर्यफूल, मोहरी, खुरसणी, खोबरे, जवस व बदाम यास अधिक मागणी आहे. सध्याच्या जीवनशैलीमुळे ताणतणाव व अवेळी जेवणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत आहे. त्यासाठी अनेक जण आरोग्याबद्दल सजग झालेले आहे.

याचाच एक भाग म्हणून आहारामध्ये घाण्याच्या शेंगदाणा व निरनिराळ्या पदार्थांचे तेल आहारात वापरले जात आहे व त्याचा निश्चित फायदाही होत आहे. बाजारातील प्रचलित तेल भाजीमध्ये दोन चमचे टाकावे लागत असेल मात्र घाण्याच्या तेल एकच चमचामध्ये योग्य प्रकारे भाजी बनते. त्यामुळे किंमत जरी जास्त असली आर्थिकदृष्ट्या परवडते. घाण्यामधून तेल काढल्यानंतर चोथा स्वरूपात राहिलेली पेंडीलाही मागणी आहे.

विशेष करून फळबाग करणारे शेतकरी, बागायतदार एक्स्पोर्ट कॉलिटीचे उत्पादन करणारे द्राक्ष उत्पादक खत स्वरूपात ही पेंड वापरतात. यासाठी काळजी मात्र एवढी घ्यावी लागते की पेंड ओली असल्यानंतर उन्हात सुकवून नंतरच ती खतासाठी विक्री केली जाते. अन्यथा जर ओली राहिली तर तिला बुरशी लागते. साधारणतः ३० ते ४० रुपये किलो दराने या पेंडेची विक्री होते. (latest marathi news)

घाण्याच्या तेलाचे फायदे

* नैसर्गिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले जाते

*शुध्द तेलाचा सुगंध येतो, कारण ४-५ प्रकारचे प्रोटिन्स असतात.

*लाकडी घाण्याचे तेल आरोग्यवर्धक आहे.

* वात दोष संतुलित राहतो आणि त्यामुळे वाताच्या प्रकोपाने होणारे आजार होत नाहीत.

लाकडी घाण्याच्या तेलात जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात

*घाण्याच्या शेंगदाणा तेलामुळे एचडीएल वाढते आणि हेच एचडीएल आपल्या शरीरासाठी आवश्यक असते.

घाण्याच्या तेलाचे प्रतिकिलो दर

शेंगदाणा ३२०

तीळ ५००

करडई ३००

सूर्यफूल ४००

मोहरी ३६०

खुरसणी ४५०

खोबरे ५००

जवस ५२०

बदाम ३०००

"नैसर्गिक स्तोत्रापासून तयार होणाऱ्या पदार्थांकडे सध्या नागरिकांचा कल आहे. आमच्याशी जोडलेले जवळपास दोन हजार ग्राहक घाण्याचे तेल वापरतात. सुरवातीला काही दिवस आहारात सेवन केल्यानंतरच त्यांना शारीरिकदृष्ट्या स्वस्थता व उत्साह जाणवतो जाणवतो. मला ही मोठी आरोग्याची समस्या काही वर्षांपूर्वी उद्भवली होती. उपचार घेतल्यानंतर आहारामध्ये घाण्याच्या तेलाचा वापर सुरू केला व मला लवकर स्वस्त वाटू लागले." - मनीष हिरे, नेचर सीड्स ऑइल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amazon child shopping: आता बोला...! आई-वडील झोपेतच अन् तिकडं त्यांच्या लाडक्या चिमुकल्यानं चक्क 'अमेझॉन'वर केली अडीच लाखांची खरेदी

Mahadev Munde Case: खळबळजनक! '‘महादेव मुंडे खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला वाल्मीकने संपवलं’', आकस्मिक मृत्यूचा बनाव

MLA Ramesh Thorat : माजी आमदार रमेश थोरात घड्याळ हाती बांधण्याच्या तयारीत; अशोक पवार मात्र पक्षातच समाधानी

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

MLA Rahul Kul : उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडीत बंधारे उभारावेत; आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

SCROLL FOR NEXT