Dada Bhuse
Dada Bhuse esakal
नाशिक

Dada Bhuse : दुष्काळग्रस्तांना 243 कोटींची मदत : पालकमंत्री दादा भुसे

सकाळ वृत्तसेवा

Dada Bhuse : जिल्ह्यात भीषण दुष्काळामुळे गेल्या खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी २४३ कोटी रुपये जाहीर झाले आहेत. मालेगाव, येवला व सिन्नर तालुक्यांतील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांत निर्माण झालेली भीषण परिस्थिती लक्षात घेता खरीप हंगाम २०२३ मध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले. (nashik Guardian Minister Dada Bhuse marathi news)

त्यांना मदतीसाठी राज्य सरकारने दोन हजार ४४३ कोटी २२ लाख ७१ हजारांचा निधी वितरणास मान्यता दिली आहे. शासन निर्णय गुरुवारी (ता. २९) निर्गमित करण्यात आला. त्याचा जिल्ह्यातील मालेगाव, येवला, सिन्नर या तालुक्यांना लाभ होणार आहे.

मालेगाव तालुक्याला १०८ कोटी ९२ लाख ३३ हजार, तर सिन्नर तालुक्यासाठी ७५ कोटी ८१ लाख, येवला तालुक्यासाठी ६३ कोटी ३३ लाख इतका निधी वितरित केला आहे. दरम्यान, उर्वरित तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनाही आता मदतीची प्रतीक्षा लागून आहे. (latest marathi news)

मालेगावला दहा लाख शेतकऱ्यांना लाभ

मालेगाव तालुक्यातील १० लाख १९ हजार १२ शेतकऱ्यांना या दुष्काळ निधीचा लाभ मिळणार आहे. त्यात दोन हेक्टरच्या आतील एक लाख सहा हजार ७९५ इतक्या क्षेत्रावर, तर दोन ते तीन हेक्टरच्या सहा हजार ५६६ क्षेत्रावर दुष्काळ स्थिती निर्माण झाली आहे.

शासन निर्णयानुसार, जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदनविषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची स्थिती या सर्व घटकांचा विचार करून दुष्काळ जाहीर करण्यात आला होता.

''या निधीच्या माध्यमातून जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार आहे. नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याचा यात विचार केला. शेतकऱ्यांप्रती राज्य सरकार समर्पित असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.''- दादा भुसे, पालकमंत्री (नाशिक)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: ९० वर्षांचे भाजप नेते राम नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT