नाशिक

तालवाद्याच्या लयबद्ध नादाला रसिकांची दाद

CD
लयबद्ध नादाला रसिकांची दाद नाशिक : नादब्रहृमवासी तालमणी पं. जयंत नाईक यांना नाद सुमनांजली अर्पण करण्यासाठी रविवारी (ता.२५) आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात शिष्यांच्या सुरेल सादरीकरणाने ताल नाद रंगतदार ठरला त्याला उपस्थित श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. शालिमार येथील आय.एम.ए. हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात पं. नाईक यांचे शिष्य ओंकार भुसारे, भूषण जगताप, मांगल्य देवरे, तेजल जगताप, कार्तिकी अहिरे यांनी तबल्यावर कायदा, रेले सादर केले. लौकिक संत, कौस्तुभ नेमाडे यांची जुगलबंदीने कार्यक्रमाला रंगत आली. श्लोक गाडेकर, आयुष जगताप, सोहम चंद्रमोरे , श्रीहर्ष कुलथे यांनी जयताल सादर करून रसिकांना मोहिनी घातली. साहिल टकाटे याने ड्रम आणि कौस्तुभ स्वाई यांच्या आगळ्या वेगळ्या जुगलबंदीने सर्वांचे लक्ष वेधले. कार्यक्रमात चित्रा नाईक, अमोल नाईक यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पं. अविराज तायडे, पं. सुभाष दसककर, नितीन पवार, राजन भावसार, शुभांगी भावसार उपस्थित होते. कार्यक्रमात अमोल नाईक, आदित्य कुलकर्णी, देवेंद्र गुरव, सचिन जगताप, स्वप्नील भिसे यांच्या शिष्यांनी आपली तबला कला अप्रतिमपणे सादर केली. गायन सागर कुलकर्णी यांनी केले. अभिजित भाटजिरे, सौरीश कबीर यांनी साथसंगत केली. निवेदन डॉ. श्रीपाद घोलप, मृणाल जोशी यांनी केले. ----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत जागतिक दर्जाचे मरीना उभारणार, ९२३ कोटींचा प्रकल्पाची घोषणा; सुरक्षिततेला प्राधान्य

Beed Crime : चमत्काराचा बहाणा करून वृद्धाला लुबाडणारा सराईत जेरबंद; परळी बसस्थानकातील अंगठी लांबवणाऱ्या नाशिकच्या ठगास एलसीबीच्या बेड्या

Maharashtra Live News: छत्रपती कारखान्याचे १५ दिवसात १ लाख ७३५३ टन उसाचे गाळप

E-Bus Fire : पुण्यात चालत्या ई-बसला आग; १७ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला!

दिल्लीतील धुक्याचा भारत श्रीलंका वनडे सामन्याला फटका बसणार? रोहित विराटच्या चाहत्यांची धाकधूक वाढली, सामना दुसरीकडे हलवण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT