Anjaneri Hanuman  esakal
नाशिक

Hanuman Jayanti 2024 : ‘हनुमान चालिसा’ चे दोन लाख भाविक करणार पठण! अंजनेरी पर्वतावर हनुमान जन्मोत्सव तयारी अंतिम टप्प्यात

Nashik News : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्रीक्षेत्र अंजनेरी येथे मंगळवारी (ता. २३) हनुमान जन्मोत्सव साजरा होणार आहे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्रीक्षेत्र अंजनेरी येथे मंगळवारी (ता. २३) हनुमान जन्मोत्सव साजरा होणार आहे. उत्सवाला दोन लाख श्रीरामभक्त श्री हनुमान चालिसा पठण करणार आहेत. या वेळी विश्वविक्रमी महाआरती करण्यात येईल, अशी माहिती पंचमुखी हनुमान मंदिर महंत भक्तीचरणदास महाराज यांनी मंगळवारी (ता. १६) दिली. (Nashik Hanuman Jayanti 2024 Two lakh devotees will recite Chalisa)

हनुमान जन्मस्थान संस्थेतर्फे कालिका मंदिर सभागृहात पत्रकार परिषद झाली. या वेळी त्र्यंबक येथील स्वामी सोमेश्वरानंद, अनिकेतशास्त्री देशपांडे, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, कालिका मंदिर ट्रस्ट अध्यक्ष अण्णा पाटील आदी उपस्थित होते. अयोध्येत भव्य असे श्रीराम मंदिर निर्माण झाले. परंतु रामभक्त हनुमान यांचे जन्मस्थान असलेला अंजनेरी पर्वत सोयी- सुविधांपासून अद्यापही वंचित आहे.

अयोध्येच्या धर्तीवर अंजनेरीचा विकास व्हावा, यासाठी हनुमान जन्मस्थान संस्था एका तपांपासून पाठपुरावा करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून यंदा अंजनेरी येथे दोन लाख भाविक तसेच साधू-महंतांच्या उपस्थितीत सकाळी पावणेदहा वाजता हनुमानाची महाआरतीचे नियोजन आहे. यानिमित्ताने सामूहिक हनुमान चालिसा पठण तसेच विविध धार्मिक कार्यक्रम होतील. उत्सवासाठी भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन हनुमान जन्मस्थान संस्था व ग्रामस्थांनी केले आहे.  (latest marathi news)

स्वच्छता मोहीम राबविणार

महाआरतीसाठी येणाऱ्या भाविकांसाठी हनुमान जन्मस्थान संस्था व अंजनेरी ग्रामस्थांतर्फे मोफत पिण्याच्या पाण्यासह प्राथमिक औषधोपचाराची सुविधा पुरविली जाणार आहे. तसेच अंजनेरी पर्वताचे पावित्र्य राखण्यासाठी स्थानिक व स्वयंसेवकांकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

असे आहेत कार्यक्रम

अंजनेरी येथे ध्वजारोहन, पहाटे पाचपासून साधू-महंतांच्या हस्ते महायज्ञ, सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी महाआरती, हनुमान बीजमंत्र पठण, साधू-महंतांना भगवे वस्त्रदान, भक्तांसाठी महाप्रसाद, दोन लाख भाविक करणार हनुमान चालिसा पठण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपतीला विजय मिळाला पण सत्ता नाही! मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी कुणाशी हातमिळवणी करणार? राज्यात त्रिशंकू स्थिती

Assembly election results 2026 Update : आसामसह बंगालमध्ये कमळ फुललं, तामिळनाडुत थलपतीचा विजय तर केरळमध्ये पुन्हा काँग्रेस

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Mumbai News: धारावीतील गोंधळ संपणार? अनिर्णित म्हणजे अपात्र नाही, प्राधिकरणाचा स्पष्ट संदेश

Line Fire: सय्यदपुरात महावितरणची मुख्य तार तुटून रस्त्यावर भीषण आग

SCROLL FOR NEXT