Such a divine scene was created due to the cyclone that suddenly appeared in the dam. dead chickens are seen. esakal
नाशिक

Nashik Heavy Rain: मुकणे धरणात चक्रीवादळासह झालेल्या पावसामुळे पोल्ट्री फार्मचे उडाले शेड; 250 कोंबड्यांचा मृत्यू

विजय पगारे

Nashik Heavy Rain : इगतपुरी तालुक्यासह सध्या जिल्हाभरात कुठे ना कुठे जोरदार तर कुठे ढगफुटी सदृश्य पाऊस बरसत आहे. मात्र इगतपुरी तालुक्यात आज एक नैसर्गिक चमत्कार अनुभवयास मिळाला तो म्हणजे ऐन धरणाच्या पाण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पडण्याचा.

मात्र तोढगफुटी सदृश्य पाऊस नव्हताच,तर ते होतं चक्रीवादळ. कोणतही वादळ हे स्थळ, काळ व परिस्थिती बघुन येत नाही. याचा प्रत्ययही आज आला.

या अचानकपणे आलेल्या चक्रीवादळामुळे व त्याच्या चक्राकार वेगामुळे धरणातील पाण्याने सुध्दा त्याच्या तालावर ठेका धरत थेट आकाशाकडे झेप घेतली. (Nashik Heavy Rain Poultry farm shed blown away due to cyclonic rains in Mukne Dam 250 chickens died)

पहील्यांदाच घडला अचंबा

या सर्व वेगवान प्रक्रियेमुळे धरणात जणुकाही धरणाच्या पाण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पडतोय की काय ? असा भास व तशीच परिस्थिती दिसत होती. या प्रक्रियेला काही शास्त्रीय वा नैसर्गिक कारण असु शकते.

मात्र हे सर्व पहिल्यांदाच घडत असल्याने संपुर्ण गाव व पंचक्रोशी सह तालुका अचंबित झाला.मात्र निसर्गाचा महीमा अगाध आहे. तो कधीच कुणाला कळाला नाही. तर आपली कुठे बात आली.

याची सर्वांनी परिणीती जाणली व ती एक नैसर्गिक घटना मानुन सर्वांनीच नि: श्वास सोडला. मात्र या सर्व घटनेने विविध चर्चांना उधान येवुन समाज माध्यमाला एक वेगळा विषय चोखाळता आला.

चक्रीवादळासह झालेल्या पावसाने पोल्ट्री फार्मचे नुकसान : इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणाच्या कावनई भागात शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास चक्रीवादळासह झालेल्या पावसाने पोल्ट्री फार्मचे पत्रे उडून त्यातील २५० च्या आसपास कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.

मिनीनाथ गुळवे यांच्या पोल्ट्री फार्मचे अंदाजे १ ते सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. चक्रीवादळच्या तीव्रतेने धरणातील पाणी पावसाप्रमाणे हवेत उडतांना दिसत होते. धरणाच्या दिशेने चक्रीवादळ तयार होऊब जोरदार पाऊसही असल्याने हे वादळ थेट जवळच असलेल्या गुळवे यांच्या पोल्ट्रीफार्मवर आले.

यात पोल्ट्री फार्मवरील पत्रे फुटुन पोल्ट्री शेडमध्ये असलेल्या कोंबड्या मरण पावल्या.शेतीस जोडधंदा म्हणुन सुरू असलेल्या पोल्ट्रीचे चक्रीवादळाच्या पावसामुळे श्री.गुळवे यांचे जवळपास १ ते सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : मानाचा चौथा तुळशीबाग गणपती बेलबाग चौकात दाखल, पाहा थेट प्रक्षेपण

Pune Metro : गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोचा मोठा निर्णय; रात्री 11 वाजेपर्यंत सलग 41 तास धावणार मेट्रो, प्रवाशांना दिलासा

Latest Maharashtra News Updates : ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी विदर्भात बैठक

10,000 कोटींच्या मालकाची बायको, परंतु अभिनेत्री राहिली गटारीशेजारच्या झोपडीत, कारण ऐकून थक्क व्हाल

Chandra Grahan 2025: पितृपक्षाच्या पहिल्याच दिवशी लागणार चंद्रग्रहण, एक दिवस आधीच करा तुळशीशी संबंधित 'ही' कामे

SCROLL FOR NEXT