As the road from Panewadi to Awhad has been washed away, contact with the residents of the settlement has been lost. esakal
नाशिक

Nashik Monsoon News : मनमाडला दुसऱ्या दिवशीही मुसळधार; पानेवाडी-आव्हाड वस्ती रस्ता गेला वाहून

Nashik News : शहर व परिसराला बुधवारी (ता. १२) सलग दुसऱ्या दिवशीही दुपारपासून दमदार पावसाने चांगलेच झोडपले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहर व परिसराला बुधवारी (ता. १२) सलग दुसऱ्या दिवशीही दुपारपासून दमदार पावसाने चांगलेच झोडपले. येथून जवळच असलेल्या पानेवाडी येथे गेल्या सहा महिन्यांपूर्वीच झालेला पानेवाडी ते आव्हाड वस्ती रस्ता वाहून गेल्याने वस्तीवरील नागरिकांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे या रस्त्याचा दर्जा वाहून गेल्यामुळे उघडकीस आला आहे. (Heavy rains in Manmad)

संबंधित रस्ता करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, ‘पाऊस आला धावून, रस्ता गेला वाहून’ अशीच परिस्थिती झाली आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच झालेला रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मनमाडच्या शहर परिसरात सुमारे अडीच तास झालेल्या पावसाने मनमाडसह परिसर जलमय झाला.

तर शहरातून वाहणाऱ्या रामगुळणा व पांझण नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आले होते. पानेवाडी, नागापूर, एकवई, कऱ्ही परिसराला पावसाने पुन्हा दुसऱ्या दिवशी पावसाने दणका दिल्याने शेत शिवार जलमय झाले. (latest marathi news)

नद्या-नाले ओसंडून वाहत आहे. यावेळी सर्वच छोटे-मोठे बंधारे भरल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. पानेवाडी येथील नव्यानेच तयार झालेला रस्ता वाहून गेल्याने वस्तीसह त्याबाजूने गावाकडे येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांचा संपर्क तुटला आहे.

रस्ता करणाऱ्या ठेकेदाराने दर्जेदार केलेल्या कामाचे पितळ उघडे पडले असून, या ठेकेदारावर कारवाई करतील का, असा प्रश्‍न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT