Chickens killed in a rain esakal
नाशिक

Nashik Heavy Rain: निफाडच्या उत्तरपट्यात पावसाचा रुद्रावतार! उगावला 30 कुटुंबाच्या घरात पाणी, शिवडीला 2 हजार कोंबड्यांचा मृत्यू

Latest Heavy Rain News : पालखेडलाही अनेक शेतकरी कुटुंबांच्या घरात पाणी शिरले तर शिवडी येथे पोल्ट्रीमध्ये पाणी शिरल्याने दोन हजार पक्षांचा मृत्यू झाला आहे. विनता नदीला मोठा पूर आल्याने उगाव- पिंपळगाव रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

निफाड : तालुक्याच्या द्राक्ष आगारात रविवारी (ता.१३) झालेल्या मुसळधार पावसाने रुद्रावतार धारण केल्याने मोठे नुकसान झाले आहे. उगाव येथे तीस कुटुंबांच्या घरासह शाळेत पाणी शिरले. पालखेडलाही अनेक शेतकरी कुटुंबांच्या घरात पाणी शिरले तर शिवडी येथे पोल्ट्रीमध्ये पाणी शिरल्याने दोन हजार पक्षांचा मृत्यू झाला आहे. विनता नदीला मोठा पूर आल्याने उगाव- पिंपळगाव रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. (Heavy rains in North Patta of Niphad)

सोमवारी (ता.१४) पहाटे दोनच्या सुमारास विनता नदीला पूर येऊन निफाड तालुक्यातील शिवडी येथे दत्तात्रेय क्षीरसागर यांच्या कुकुटपालन केंद्रात पुराचे पाणी शिरल्याने दोन हजारावर पक्ष्यांचा मृत्यू झाला. या आपत्तीमध्ये क्षीरसागर यांचे तब्बल सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारींनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचे पंचनामे केले.

निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्याशी पूरपरिस्थिती विषयी चर्चा केली असता ते म्हणाले,‘ रानवड मंडळात रात्रीच्या सुमारास ६२ एमएम पाऊस झाल्याची नोंद आहे. यामुळे आणि चांदवड व निफाडलगतच्या परिसरात अतिवृष्टीमुळे वडाळी आणि तिच्या जवळच्या नद्यांना अचानक पूर आला. (latest marathi news)

या तडाख्यामध्ये वडाळी नदीला आलेल्या पुरामध्ये उगाव येथील २५ ते ३० कुटुंबांना झळ बसली. त्यांच्या घरांमध्ये पाणी शिरले, महसूल व प्रशासन विभाग सतर्क असल्याने पाणी वाढेल याची कल्पना येताच मंडल अधिकारी श्रीमती शीतल कुयटे, उगावचे तलाठी अमोल चव्हाण, कोतवाल संतोष त्रिंबके यांनी तातडीने हालचाल करीत नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा दिला. पालखेड येथे देखील बंधाऱ्याची माती वाहून गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पुराचे पाणी घुसले. उगाव, वनसगाव, सारोळे, नांदुर्डी या परिसरामध्ये पावसाने धुमाकूळ घातला होता.

मनोरूग्णाची स्टंटबाजी

उगाव येथे नदीकाठच्या परिसरातील २५ ते ३० कुटुंबांच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरले, मात्र प्रशासनाच्या सावधानतेमुळे या सर्व कुटुंबांना वाचवणे शक्य झाले. त्याच दरम्यान एका मनोरुग्ण महापुराच्या पाण्यात घुसून स्टंटबाजी करू लागला. मंडल अधिकारी श्रीमती शीतल कुयटे यांनी कुशलतेने परिस्थिती हाताळून त्याची समजूत काढली आणि त्याला सुरक्षित स्थळी हलवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : भारताच्या मीराबाई चानूनं रौप्य पदक पटकावलं

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT