मुलींच्या लग्नापर्यंतची जबाबदारी शिवनिश्‍चल सेवाभावी ट्रस्टने घेतली. sakal
नाशिक

नाशिक : आदिवासी कुटुंबातील लेकरांना मदतीचा हात

मुलांच्या शिक्षणाची व मुलींच्या लग्नापर्यंतची जबाबदारी शिवनिश्‍चल सेवाभावी ट्रस्टने घेतली.

सकाळ वृत्तसेवा

देवळा/ खामखेडा : वार्शी (ता. देवळा) येथील आदिवासी कुटुंबातील कर्त्या व मातृत्व जपणाऱ्‍या महिलेचे नुकतेच निधन झाल्याने तिच्या चार मुलांचे मायेचे छप्पर तर हिरावले गेलेच; शिवाय या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याने आता पुढे काय, असा प्रश्‍नही निर्माण झाल्याची चर्चा सोशल मीडियातून व्यक्त होतात समाजातील संवेदनशीलता जोपासणाऱ्या सामाजिक संस्था, तसेच व्यक्तींनी तातडीची मदत उपलब्ध करून दिली. यामुळे या कुटुंबास हातभार लागला आहे. मुलांच्या शिक्षणाची व मुलींच्या लग्नापर्यंतची जबाबदारी शिवनिश्‍चल सेवाभावी ट्रस्टने घेतली.

तालुक्यातील वार्शी या आदिवासीबहुल गावातील उन्हाजी पवार यांची पत्नी संगीता हिचे पाच दिवसांपूर्वी आजाराने निधन झाले. या दाम्पत्यास चार लहान मुले असून, आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. हातावर पोट असणाऱ्या या कुटुंबाची कथा सामाजिक माध्यमातून प्रकट होताच काही मदतीचे हात तातडीने पुढे आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. त्यात माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी रोख अकरा हजार रुपयांची मदत या कुटुंबाकडे पोहोच केली. देवळा पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक निलेश सावकार व सचिन भामरे यांनीही पाच हजार रुपये या कुटुंबाला देऊ केले.

शिवव्याख्याते तथा शिवनिश्‍चल सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष यशवंत गोसावी यांना या कुटुंबाची स्थिती कळताच त्यांनी थेट या कुटुंबाची भेट घेत त्यांना पंधरा हजार रुपये दिले. शिवाय या लहानग्या मुलांच्या शिक्षणाची व मुलींच्या लग्नापर्यंतची जबाबदारी स्वीकारत जणूकाही हे कुटुंबच दत्तक घेतले. या वेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. डी. के.आहेर, प्रहारचे कृष्णा जाधव आदी उपस्थित होते.

देवळा तहसिलदारांनीही या कुटुंबास किराणा व धान्य उपलब्ध करून दिले. तसेच, खालप येथील माजी उपसरपंच व शिवसेनेचे माजी विभागप्रमुख बारकू सूर्यवंशी यांनीही अकरा हजार रुपये या कुटुंबास देत हातभार लावला. मदतीचा हा स्रोत चालू असल्याने हे कुटुंब सावरण्यास मदत झाली आहे.

शिवनिश्‍चल सेवाभावी ट्रस्टने उचलली शिक्षणाची जबाबदारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त! 20 दिवसांतील सर्वात कमी दर, 10 तोळ्यांमागे 36,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा भाव

Miraj PSI Death : मिरजेतील पीएसआयने कॉल, मेसेजला उत्तर दिलं नाही; नंबर ट्रॅक लावला अन् घटनास्थळी पाहताच, एसपींसह सांगली पोलिसांना बसला धक्का

Latest Marathi News Live Update : ग्रामीण भागातही गॅससाठी रांगा, मोवाड-नरखेडमध्ये नागरिकांची सकाळपासून गर्दी

Nashik: कुंभमेळ्याची तयारी सुरु असताना नाशिकला ‘पाण्याचा आशीर्वाद’? अंडरपास खोदकामात सापडली १२५ वर्षांपूर्वीची पाण्याने भरलेली विहीर

Kolhapur Money Fraud : नफ्याच्या आमिषाने २१ लाखांची  फसवणूक ; संशयित गडहिंग्लजचा, व्यापारी चंदगडचा

SCROLL FOR NEXT