नाशिक

श्रॉफ हायस्कुलच्या खेळाडूंची राज्यस्तरावर निवड

CD
फोटो : NSK26H33849 नंदुरबार : क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळांडूसमवेत उपस्थित सुषमा शाह, प्रशांत बागूल, भिकू त्रिवेदी, सीमा पाटील, सुनील शाह, नितीन देवरे, विमलेश बागूल. ---------------------------------- हि. गो. श्रॉफ हायस्कूलच्या खेळाडूंची राज्यस्तरावर निवड नंदुरबार, ता. २९ : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाअंतर्गत होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय वूशू स्पर्धेसाठी येथील श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सात खेळाडूंची निवड झाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी १७ वर्षांखालील मुला- मुलींच्या गटात रोशनी नागरे आणि केशव चौधरी यांची निवड झाली आहे. १९ वर्षांखालील गटात नीरज देवरे (८५ कि.ग्रॅ), रितेश पाटील (९० कि.ग्रॅ), खुशी चव्हाण (४८कि.ग्रॅ), जान्हवी माळी (६० कि.ग्रॅ) आणि अनुष्का चौधरी (५६ कि.ग्रॅ) या पाच खेळाडूंची निवड झाली. या वयोगटातील राज्यस्तरीय स्पर्धा नंदुरबार येथे होणार आहेत. या खेळाडूंना जगदीश वंजारी, मनीष सनेर आणि हेमचंद्र मराठे यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेच्या समन्वयक सुषमा शाह, मुख्याध्यापक प्रशांत बागूल, उपमुख्याध्यापक भिकू त्रिवेदी, पर्यवेक्षिका सीमा पाटील, पर्यवेक्षक सुनील शाह, नितीन देवरे आणि विमलेश बागूल यांनी कौतुक केले. या विभागीय स्पर्धेचे वूशू संघटनेचे सचिव संयोजन रामा हटकर यांनी केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL AUCTION 2027: वय फक्त १५ वर्षे, WPL ऑक्शनमध्ये इतिहास! दिल्ली कॅपिटल्सने उमा काशवीला निवडलं, कोण आहे ही युवा अष्टपैलू खेळाडू?

Meenakshi Shinde Resign: माझ्या मनाला प्रचंड वेदना होतायत..., मीनाक्षी शिंदेंनी राजीनाम्याच्या पत्रात नेमकं काय लिहलंय?

Latest Marathi News Update: आदिवासी महिलेचे चोरी झालेले मंगळसूत्र मिळाले

School Books: सरकार बदललं अन् शालेय पाठ्यपुस्तकातील 'हे' शब्दही बदलले; पश्चिम बंगालमध्ये मुघल इतिहासाला कात्री

Israel Politics: बहुमत हुकलं तरी नेतान्याहू 'प्रचंड आशावादी'! थेट विरोधकांशीच आघाडीची तयारी

SCROLL FOR NEXT