Family at Savita and Nilesh's wedding here. esakal
नाशिक

Nashik News : उच्चशिक्षित तरुणाने बांधली दिव्यांग शिक्षिकेशी रेशीमगाठ; एक विवाह ऐसा भी...

Nashik : अजंग (ता. मालेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग शिक्षिका सविता बाजीराव निकम यांचा हा जीवनप्रवास.

संदीप पाटील

Nashik News : प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द, चिकाटी, सतत प्रयत्नवादी असल्यास मार्ग नेहमीच सापडतो. अजंग (ता. मालेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग शिक्षिका सविता बाजीराव निकम यांचा हा जीवनप्रवास. त्या नुकत्याच ढवळीविहीर येथील उच्चशिक्षित, बागायतदार शेतकरी निलेश साहेबराव हिरे यांच्यासमवेत संसाररूपी वेलीत गुंफल्या गेल्या. बायोटेक झालेल्या निलेश यांनीही धाडसी निर्णय घेतला. (highly educated youth wedding with disabled teacher )

त्यांनी एकमेकांशी रेशीमगाठ बांधल्याने परिसरात ‘एक विवाह ऐसा भी’ अशीच चर्चा होत असून, निलेश व हिरे परिवाराचे कौतुक होत आहे. जन्मतःच दृष्टी नसलेल्या सविता निकम या दाभाडी येथील बाजीराव निकम व सुनंदा निकम यांच्या कन्या आहेत. तीन भावंडांमध्ये सवितास जन्मतःच दृष्टी नसल्याने दहावीपर्यंतचे शिक्षण नाशिक येथील महानॅब स्कूल फॉर ब्लाइंड येथे झाले.

नाशिक येथेच डीएडचे शिक्षण घेत टीईटी परिक्षा देखील उत्तीर्ण झाल्या. ऑगस्ट २०२० पासून त्या अजंग येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. सविताचे सासरे साहेबराव हिरे निवृत्त शिक्षक असून, दुसरा मुलगा अमोल हिरे मॉर्गन कंपनीत आहे. त्यांचा मोठा परिवार आहे. आई, वडील, नातलगांची सविताच्या विवाहाची विवंचना संपली असून, हिरे परिवाराविषयी आनंदात आहेत. (latest marathi news)

सविता पाचवीच्या वर्गशिक्षिका असून, तीस विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देतात. मनाने खंबीर असलेल्या सविता हेड प्रोजेक्टर, मोबाईल, स्पिकर वापरत तसेच हुशार विद्यार्थ्यांकडून फलखलेखन करून घेत शिक्षण देत आहेत. विद्यार्थ्यांच्या आवडत्या शिक्षिका असून, सहकाऱ्यांसोबत मिळून मिसळून राहतात.

''निलेश यांनी माझा स्विकार तर केलाच, परंतु संपूर्ण हिरे परिवार मला खूपच समजून घेतोय. भविष्यात वर्ग एक अधिकारी व सुजान भारतीय नागरिक बनण्याचे स्वप्न आहे.''- सविता निकम, प्राथमिक शिक्षिका, अजंग

''कोण काय म्हणेल याची पर्वा न करता सविताची निवड केली. आयुष्यभर तिच्या सुख-दुःखात सोबत राहून समाजासमोर एक नवीन आदर्श निर्माण करू. आमच्या परिवाराकडून सवितास कधीही दुःख दिले जाणार नाही.''- निलेश हिरे, ढवळीविहीर

''सविता विद्यार्थीप्रिय शिक्षिका असून, बुद्धिमान आहेत. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत थोड्यावरून हुलकावणी मिळत आहे. एक दिवस त्या वर्ग-एकच्या अधिकारी निश्‍चित होतील.''- संजय देवरे, मुख्याध्यापक, अजंग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad Announcement: द. आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी गिलच्या ऐवजी 'हा' खेळाडू भारताचा कर्णधार; ऋतुराज, जडेजाचे पुनरागमन

मराठी बिग बॉस सुरु होणार? कलर्स मराठीने शेअर केला व्हिडिओ, नेटकरी म्हणाले...'बिग बॉसचा ६ वा सिझन...'

धक्कादायक घटना ! 'वांगीमध्ये दोन युवकांनी जीवन संपवले'; परिसरात पसरली शोककळा, सुरेशची आई शेतात गेली अन्..

Latest Marathi News Live Update : घटना घडली तेव्हा घरात नव्हतो, खिडकीतून आत प्रवेश केला, गौरीचा पती अनंत गर्जेचे स्पष्टीकरण

Blind Women's T20 World Cup: भारतीय महिला पुन्हा जगज्जेत्या! कोलंबोत पहिला वर्ल्ड कप जिंकत मानाने फडकवला तिरंगा

SCROLL FOR NEXT