Dangerous hoarding at the old CBS. The second photo shows the hoarding at the central bus station esakal
नाशिक

Nashik News : सरकारी जागांवरील होर्डिंग्ज धोकादायक! घाटकोपर दुर्घटनेनंतर शहरात तपासणी

Nashik News : सरकारी जागेतील होर्डिंग्ज धोकादायक आढळून आल्याने विविध कर विभागाकडून नऊ होर्डिंग्ज उतरविण्याच्या सूचना दिल्या.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : घाटकोपर येथे घडलेल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर शहरातील खासगी होर्डिंग्जची तपासणी करण्यात आली. मागील वर्षातच कागदपत्र तपासणीसह स्ट्रक्चरल तपासणी करण्यात आल्याने अनियमितता आढळली नाही. परंतु सरकारी जागेतील होर्डिंग्ज मात्र धोकादायक आढळून आल्याने विविध कर विभागाकडून नऊ होर्डिंग्ज उतरविण्याच्या सूचना दिल्या. (hoardings in government premises were found dangerous)

बीएसएनएलचे होर्डिंग्ज मात्र तातडीने उतरविण्यात आले. मुंबईतील घाटकोपर भागातील खेडानगरमध्ये पूर्व द्रुतगती महामार्गाजवळ एका पेट्रोलपंपावर होर्डिंग फाउंडेशनसह उखडून पडले. यामध्ये आठ जणांचा मृत्यू व ६९ जखमी झाले. त्यामुळे नाशिक महापालिका हद्दीमध्ये असलेल्या होर्डिंगची तपासणी करण्याच्या सूचना तातडीने दिल्या.

मागील वर्षी पिंपरी चिंचवडमध्ये महामार्गावर अशाच प्रकारे होर्डिंग कोसळून जीवितहानी झाली होती. त्या वेळी शहरातील होर्डिंगधारकांना स्पष्टपणे सूचना देऊन स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यात आले होते. घाटकोपरच्या घटनेनंतर महापालिका हद्दीतील खासगी व सरकारी जागेवरील होर्डिंग्जच्या स्ट्रक्चरची तपासणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

त्यानुसार खासगी जागेवरील होर्डिंग्जच तपासणी करण्यात आली. महापालिका हद्दीमध्ये चाळीस फुटांच्या वर होर्डिंग्जला परवानगी नाही. स्ट्रक्चरल ऑडिटचे अहवाल मागील वर्षीच महापालिकेला सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे खासगी जागेवरील बहुतांश जाहिरात होर्डिंग्ज नियमात असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला, परंतु सरकारी जागेवरील होर्डिंग्ज नियमात नसल्याची बाब आढळून आल्याने ते होर्डिंग्ज उतरविण्याच्या सूचना दिल्या आहेत. (latest marathi news)

बीएसएनएलच्या हद्दीतील होर्डिंग्ज तातडीने उतरविले

खासगी जागांवरील होर्डिंग्ज नियमात असल्याने विविध कर विभागाने घाटकोपर दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर सरकारी जागांवरील होर्डिंग्जच पाहणी केली. सीबीएस व मुंबई नाका येथील राज्य परिवहन महामंडळाच्या जागेतील होर्डिंग्ज धोकादायक स्थितीत असल्याचा संशय असल्याने स्टक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान बीएसएनएलच्या हद्दीतील जाहिरात होर्डिंग्ज धोकादायक असल्याने तातडीने उतरविण्यात आले.

"घाटकोपर येथील दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर होर्डिंग्ज तपासून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. उंचावरील होर्डिंग्जमध्ये एअर स्पेस टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर सरकारी जागांवरील होर्डिंग्जच्या स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत." - विवेक भदाणे, कर उपायुक्त, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT