Nashik hot harass rise temperature in March  
नाशिक

तप्त उन्‍हाचे सोसवे ना चटके; उकाड्याने नाशिककर हैराण

ढगाळ वातावरणाने झळा कमी, उकाडा कायम

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गेल्‍या काही दिवसांपासून तापमानाच्या पाऱ्यात सातत्‍याने वाढ झाल्याने मार्चमध्ये नाशिककरांना उन्‍हाच्‍या झळा बसू लागल्‍या आहेत. दिवसा तप्त ऊन सोसवे ना झाले आहे. त्‍यामुळे जनजीवनावर परिणाम झाला असून, दुपारी सर्वत्र शुकशुकाट बघायला मिळत आहे. येत्‍या दोन महिन्‍यांत उन्‍हाचा तडाखा आणखीच वाढण्याची शक्‍यता आहे.

नुकताच मालेगावचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पार गेल्‍याची नोंद आहे. नाशिक शहर व परिसरातील तापमानही चाळिशीपर्यंत पोचल्‍याने नागरिकांना उन्‍हाळ्याच्‍या झळा बसू लागल्‍या आहेत. काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यादरम्‍यान तापमानातही घट झाली होती. मात्र, त्‍यानंतर पारा वाढत जाऊन चाळीसपर्यंत पोचला आहे. येत्‍या काही दिवसांत यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे.

आताच नाशिककरांना उन्‍हाळा असहय्य झाला आहे. दुपारी बारा ते चारच्‍या सुमारास बहुतांश ठिकाणी वर्दळ घटल्‍याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. तर या वेळेत कामानिमित्त बाहेर पडलेल्‍या नागरिकांकडून उन्‍हापासून बचावासाठी टोपी, उपरणे, स्‍कार्प आदींचा आधार घेतला आहे.

लस्सी, ताक, रसाला मागणी

उन्‍हापासून बचावात्‍मक उपाय म्‍हणून थंडपेयांना मागणी वाढली आहे. लस्सी, ताकसह रसवंती, लिंबू सरबत विक्रीचे दुकान चौकाचौकांमध्ये दिसू लागली आहेत. उसाच्‍या रसालाही मागणी वाढली आहे. तसेच अन्‍य फळांचा ज्‍यूसच्‍या विक्रीत वाढ झाली आहे. शीतपेय, आइस्क्रीमला ग्राहकांकडून मागणी होत आहे.

गॉगलला वाढली मागणी

नाशिक रोड : सध्या उन्हाचा तडाखा नाशिक जिल्ह्यात जाणवू लागल्याने गॉगलला मागणी वाढली आहे. ३७ ते ४० डिग्रीच्या दरम्यान तापमान जात असल्यामुळे डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी गॉगल लावणे हितावह असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नाशिक जिल्ह्यात सध्या विदर्भाइतकाच उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. त्यामुळे सध्या टोपी, मडके, गॉगल, एसी व कुलर यांना मोठी मागणी वाढली आहे. सध्या उन्हाचा तडाखा डोळ्यांना इजा पोहोचवणारा आहे. त्यामुळे गॉगललाही मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. महिला, पुरुष व मुलांची गॉगल खरेदीसाठी दुकानात गर्दी होत आहे.

गेल्‍या आठवड्याभरातील वातावरणाची स्‍थिती अशी

(तापमान अंश सेल्सिअसमध्ये)

  • तारीख किमान कमाल

  • १४ मार्च १४.४ ३६.२

  • १५ मार्च १७.० ३७.१

  • १६ मार्च १७.५ ३९.०

  • १७ मार्च १८.८ ३९.३

  • १८ मार्च १९.६ ३९.१

  • १९ मार्च १९.५ ३८.९

  • २० मार्च १९.०............

ढगाळ वातावरणाने झळा कमी, उकाडा कायम

शनिवार (ता. १९)पासून शहरी भागात ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे. अशात सूर्याच्‍या तप्त झळांपासून नागरिकांचा बचाव होत आहे. मात्र, उकाडा कायम असल्‍याने पंखा, कुलर, एसीचा आधार नागरिकांना घ्यावा लागत आहे. सुसाट वाऱ्यामुळेही काहीसा दिलासा मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Old Monkच्या चाहत्यांनो सावधान! ७ वर्ष जुन्या दाव्यावर कंपनीची माघार, बाटलीचा लेबल बदलणार

Manoj Jarange Patil : जरांगेंचा ‘चलो मुंबई’ नारा! मराठा बांधव मुंबईकडे कूच करण्यासाठी सज्ज

OBC Mahamorcha : ओबीसी समाजाची मोठी तयारी! १ सप्टेंबरला पाटसहून महामोर्चा

फेक नॅरेटिव्हचा आरोप, राहुल गांधींवर निशाणा अन् CJPचा नवा अर्थ; फडणवीसांच्या भाषणात काय काय?

Hockey: भारत आठव्या स्थानावर राहिल्याने हॉकी इंडियाचे अध्यक्ष नाराज; विश्वचषकातील कामगिरीवर दिलीप तिर्की म्हणाले, “मीही खूश नाही”

SCROLL FOR NEXT