Fire damage. esakal
नाशिक

Nashik Fire Accident : दापूरला घराला आग! दुचाकीसह संसारोपयोगी साहित्य खाक

Nashik Fire Accident : दापूर (ता. सिन्नर) येथे सोमवारी (ता. २५) पहाटे पाचच्या सुमारास पत्र्याच्या शेडवजा घराला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दुचाकीसह संसारापयोगी साहित्य खाक झाले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fire Accident : दापूर (ता. सिन्नर) येथे सोमवारी (ता. २५) पहाटे पाचच्या सुमारास पत्र्याच्या शेडवजा घराला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दुचाकीसह संसारापयोगी साहित्य खाक झाले. सत्यवान बाळू पालवे यांचे शेतात पत्र्याचे शेडवजा घर आहे. रविवारी (ता. २४) रात्री जेवणानंतर सर्वजण शेजारी असलेल्या दुसऱ्या घरात झोपण्यासाठी गेले. सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास अचानक उष्णता जाणवू लागल्याने पालवे यांना जाग आली. (Nashik House on fire in Dapur)

शेजारच्या घरातील साहित्याला आग लागल्याचे पाहून त्यांनी बाहेर धाव घेतली. आरडाओरड करत आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मदतीसाठी बोलावले. पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी ठरला.

आगीत दुचाकीसह संसारोपयोगी साहित्य, कपडे, रोकड, दोन तोळ्यांचे सोन्याचे दागिने खाक झाले. याबाबत माहिती मिळताच योगेश आव्हाड, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ आव्हाड, जगन्नाथ सोनवणे.

दत्ता सोनवणे, योगेश सोनवणे, अमोल शिंदे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. नायब तहसीलदार सागर मुंदडा यांनी तलाठी व ग्रामविकास अधिकाऱ्यांना नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश दिले .

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीमुळे पालवे कुटुंबीय रस्त्यावर आले आहे. शासनाने या कुटुंबाला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी दापूर ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Language: मोठी बातमी! रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय

AUS vs BAN : ऐ, निघ इथून! मिचल स्टार्क अन् मेहिदी हसन मिराझ यांच्यात शाब्दिक खडाजंगी; बांगलादेशच्या हल्ल्याने कांगारू बिथरले Video

आफ्रिकेत Business करायचाय? दक्षिण आफ्रिकेच्या Consul General नी सांगितला ‘गेटवे’ फॉर्म्युला

Maruti Suzuki Offer: ऑगस्टमध्ये कार खरेदीची मोठी संधी! तब्बल 1.85 लाखांपर्यंत फायदा; Grand Vitara, Balenoसह कोणत्या कारवर किती ऑफर?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर! दिल्लीतील प्रमुख ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

SCROLL FOR NEXT