Hunger Strike esakal
नाशिक

Hunger Strike : भ्रष्टाचाराच्या चौकशीतील दोषींतील कारवाईसाठी उपोषण!

Nashik News : बालशिंगवे येथील भ्रष्टाचाराच्या झालेल्या चौकशीतील दोषींवर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाचे बालू रामाजी कालेकर यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण केले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : बालशिंगवे (ता. इगतपुरी) येथील भ्रष्टाचाराच्या झालेल्या चौकशीतील दोषींवर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाचे बालू रामाजी कालेकर यांनी गुरुवारी (ता. ४) जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण केले. वारंवार याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन देऊनही दोषींवर कारवाई होत नसल्याने आंदोलन करीत असल्याचे कालेकर यांनी या वेळी सांगितले. (hunger strike to plead guilty to corruption probe at balshivange)

याबाबत, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बालू कालेकर यांनी दिलेल्या निवेदनात आठ मागण्यांचा समावेश असून, तत्काळ कारवाईची मागणी केली आहे. इगतपुरीतील बालशिंगवे ग्रामसेवकाविरोधात तक्रार केली आहे. यात ग्रामसेवकाने गेल्या एक वर्षापासून ग्रामसभाच घेतली नाही, गावात सुरू असलेल्या विकासकामांचा फलक लावण्यात आलेला नाही.

ग्रामसेवक मनमानी पद्धतीने काम करीत आहेत, शबरी घरकुलाचा प्रस्ताव तयार करताना ग्रामस्थांना विश्वासात घेण्यात आले नाही, फिल्टर योजना, जलजीवन योजनेचा निधी किती आला याबाबत माहिती देण्यात येत नाही, हागणदारीमुक्त गावासाठी ग्रामसेवकानेच ठेकेदार होऊन ग्रामस्थांचा निधी हडप केला आहे, भूमी अंतर्गत गटार योजना.

ठक्करबाप्पा योजनांची माहिती मिळत नाही, आमदार अॅड. माणिकराव कोकाटे यांच्या निधीतून उभारलेला सभामंडप का पाडण्यात आला, गावातील स्मशानभूमीचे काम इस्टिमेटनुसार पूर्ण झाले का, याबाबत माहिती देण्यात यावी आदी मुद्यांबाबत चौकशी करण्यात आलेली आहे. चौकशी समितीने अहवाल सादर केला. (latest marathi news)

मात्र, यातील दोषींवर कारवाई केली जात नसल्याने यापूर्वी अनेकदा आंदोलन केली. त्यावर, प्रभारी गटविकास अधिकारी प्रशांत पवार यांनी २० जूनला कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही कारवाई होत नसल्याचे आंदोलनकर्त्याने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, वरील मुद्यांबाबत सिन्नर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्राद्वारे माहिती दिली होती.

मात्र, उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सिन्नर गटविकास अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात तक्रार मुद्द्यांबाबत स्पष्टता दिसत नसल्याचे कळविले आहे. तसेच, सिन्नर गटविकास अधिकाऱ्यांना चौकशी अहवाल फेरसादर करण्यास सांगितले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT