Women fetching water from the canal. esakal
नाशिक

Nashik Water Crisis : हंडाभर पाण्यासाठी महिला घालताय जीव धोक्यात! इगतपुरी तालुक्यातील स्थिती

Nashik News : एक हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांना वणवण करावी लागत आहे. तर अनेक महिला आपला स्वत:चा जीव धोक्यात घालून कॅनॉलमध्ये उतरून पाणी आणत आहे.

सकाळ वृत्तसेवा

वाडीवऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील धारगाव ग्रामपंचायतपैकी धारचीवाडी, नाकडवाडी, कोरळवाडी, खडाडवाडी या वाड्यांना गेल्या महिन्यापासून पाणीपुरवठा होत नसल्याने येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई तयार झाली आहे. एक हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांना वणवण करावी लागत आहे. तर अनेक महिला आपला स्वत:चा जीव धोक्यात घालून कॅनॉलमध्ये उतरून पाणी आणत आहे. (Nashik Water Crisis)

इगतपुरी तालुक्यातील धारगाव ग्रामपंचायतंर्गत येणाऱ्या धारचीवाडी, नाकडवाडी, कोरळवाडी, खडाडवाडी या वाड्या आहे. वैतरणा धरणाखालील या आदिवासी वाड्या आहेत. गेल्या महिन्यापासून पाणीपुरवठा होत नसल्याने या वाड्यावरील महिलांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आलेली आहे.

अनेकदा महिला आपला जीव धोक्यात घालून वैतरणा धरणातून वीजनिर्मिती केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या कालव्यात उतरून पाणी आणत आहे. धरणातून सोडलेल्या पाण्याला प्रचंड वेग असतो. (latest marathi news)

त्या पाण्यात पडल्यानंतर त्यांना वाचणे शक्य नाही. अशी परिस्थिती असताना देखील आपला जीव धोक्यात घालून पाणी आणावे लागत आहे. या वाड्यांना पुरवठा करण्यासाठी दोन कोटी रुपयांची जलजीवन योजना राबविण्यात येत आहे.

ही योजना शोभेची वस्तु ठरत आहे. एक वर्ष झाले टाकी बांधून ठेवली. मात्र पाणी पुरवठा सुरू झाला नाही. या सर्व वाड्यांवर पाणी पुरवठा सुरू झाला नाही तर एल्गार कष्टकरी संघटना आंदोलन करेल असा इशारा अध्यक्ष भगवान मधे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT