Police action on gambling & bar esakal
नाशिक

Nashik Police: शहरातील अवैध दारुअड्डे, मटका अन जुगारअड्डे पोलिसांच्या रडारवर! 14 दिवसात 26 अवैध धंद्यांवर कारवाई

Crime News : आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना, शहरातील अवैध धंदे पोलिसांच्या रडारवर आहेत

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना, शहरातील अवैध धंदे पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये अवैध दारू अड्डे, मटका-जुगार अड्ड्यांवर धडक छापासत्र सुरू केल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून, पोलिसांनी गेल्या १४ दिवसांमध्ये २६ अवैध धंद्यांवर धाड टाकली आहे. नाशिकरोड हद्दीत सर्वाधिक अवैधरित्या देशीदारुचे अड्डे पोलिसांच्या हाती लागले आहेत. (Nashik Illegal bars matka gambling dens in city on police radar marathi news

शहरात गेल्या काही दिवसांमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे काही उपनगरीय परिसरामध्ये अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारीही वाढली आहे. तर, दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून आयुक्तालय हद्दीमध्ये अवैध धंद्यांविरोधात कठोरतेने कारवाई केली जात आहे.

गेल्या १४ दिवसांमध्ये पोलिसांनी अवैध दारुविक्रीच्या अड्ड्यांवर कारवाई करीत २३ अड्डे उदध्‌वस्त केले. यात सर्वाधिक आठ अड्डे नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असून, एका जुगार-मटका अडड्याही पोलिसांनी कारवाई करीत उदध्वस्त केला आहे.

तर, इंदिरानगरच्या हद्दीत दोन देशीदारुचे अड्डे व एका कारवाईमध्ये १८ हजारांचा गांजाही जप्त केला आहे. पोलिसांनी गेल्या १४ दिवसात २६ धाडसत्र राबवून ४९ हजार २५५ रुपयांची अवैध दारुसाठा, ५ हजार ८५० रुपयांचा जुगार-मटक्याचा मुद्देमाल व १८ हजारांचा गांजा जप्त केला आहे.

अशी आहे कारवाई

पोलीस ठाणे..... अवैध दारुअड्डे......जुगार/मटका.....अंमली पदार्थ

नाशिकरोड.......८.....१.......०

पंचवटी......२.......०......०

इंदिरानगर.....२......०.......१

अंबड........१........१.......०

मुंबई नाका.....२.........१........०

सातपूर ......१........०.....०

उपनगर.....२.........०....०

भद्रकाली....१......०........०

आडगाव......१....०......०

म्हसरुळ .......१.......०.......०

देवळाली कॅम्प .......१......०.....०

हस्तगत मुद्देमाल

पोलीस ठाणे.......अवैध दारु....मटका/जुगार.....अंमली पदार्थ

नाशिकरोड......२३१५०.......३६५०......००

पंचवटी........५२९०

इंदिरानगर.......३२१०....००......१८०००

अंबड ........२३४५........७३०......००

मुंबई नाका......८७५०......१४७०.....०००

सातपूर......१५४०

उपनगर......१४७०

भद्रकाली......८४०

आडगाव .......९८०

म्हसरुळ ........७७०

देवळाली कॅम्प.... ९१०

एकूण.......४९२५५ रु........५८५० रु.......१८००० रु.

"सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्तालय हद्दीतील अवैध धंद्यांविरोधात कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. कुठेही अवैध धंदे सुरू असल्यास पोलिसांना माहिती द्यावी, वा ९९२३३२३३११ या व्हॉटसॲपवर मेसेज करावा. माहिती देणार्यांची नावे गोपनीय ठेवली जातात. अशा अवैध धंद्यांविरोधात कारवाई केली जाईल."

- प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त, शहर गुन्हेशाखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More : ''शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी आमच्या अंगावर या''; वसंत मोरेंनी घेतला निशिकांत दुबेंचा समाचार...

Hindu Rashtra: भारत हिंदुराष्ट्र कधीपर्यंत होणार? डेडलाईन आली; शंकराचार्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं

तुलसी २.० ची पहिली झलक- ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी २’चा नॉस्टॅल्जिया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

Video : क्षणभराच्या रागात गेला जीव! निर्दयी माणसानं किरकोळ भांडणात तरुणाला धावत्या रेल्वेतून ढकललं; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील रामवाडीमध्ये पेट्रोल चोराने जाळल्या सहा मोटरसायकल

SCROLL FOR NEXT