House damage due to storm esakal
नाशिक

Nashik News : पश्चिम पट्ट्याला चक्रीवादळाचा तडाखा! सुरगाणा तालुक्यात अनेक घरे उद्ध्वस्त

Nashik News : उंबरठाण परिसरात विजांच्या कडकडाटासह झालेला गारांचा पाऊस शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ठरला.

सकाळ वृत्तसेवा

सुरगाणा- देवळा, मालेगाव : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील पेठ, सुरगाणा, कळवण व देवळा आणि बागलाणच्या काही भागाला मंगळवारी (ता.१४) दुपारी तीन ते चारच्या दरम्यान चक्रीवादळाचा तडाखा बसला. उंबरठाण परिसरात विजांच्या कडकडाटासह झालेला गारांचा पाऊस शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ठरला. (hurricane Many houses were destroyed in Surgana taluka)

उंबरठाण, बेहुडणे, निंबारपाडा, देवीपाडा, फणसपाडा, चुली (उ) या पाच ते सहा गावांना चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. यामध्ये उंबरठाण येथील २५ ते ३० घरांचे अतोनात नुकसान झाले असून, घरावरील छप्पर, सिमेंट, स्टीलची पत्रे उडाल्याने नागरिक बेघर झाले. काहींच्या घरात पावसाचे पाणी गेल्याने अनेकांचे धान्य.

कपडे, संसारोपयोगी साहित्य भिजल्याने नुकसान झाले. देवळा तालुक्यात वादळामुळे चोवीस तास वीजपुरवठा ठप्प होता. उंबरठाण परिसरात मंगळवारी चक्री वादळासदृश्‍य परिस्थिती उद्भवली. त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चक्री वादळाने कर्मचारी निवासस्थान, आरोग्य केंद्रावरील पत्रे उडाले.

तर उंबरठाण येथील डांग सेवा मंडळ शिक्षण संस्थेच्या विद्यार्थी वसतिगृह व अकरावी, बारावीच्या वर्ग खोल्यांवरील पत्रे उडाले. या चक्री वादळाचा तडाखा ठाणगाव, बाऱ्हे, आंबुपाडा बे, झगडपाडा, वांगण परिसराला बसला. चक्री वादळामुळे आंबा फळबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कच्चे आंबे वादळामुळे पडून नुकसान झाले.

तर झाडावर थोड्या प्रमाणात शिल्लक राहिलेल्या कैऱ्यांना गारपिटीने डाग पडल्याने संपूर्ण नुकसान झाले आहे. यावर्षी ढगाळ वातावरण तसेच, उन्हाचा तडाखा बसल्याने आंबा मोहराचे नुकसान झाले होते. त्यामुळे उत्पादनात घट झाली होती. त्यातच चक्रीवादळ व गारपिटीने पूर्णतः: नुकसान झाल्याने तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. (latest marathi news)

निंबारपाडा येथील गंगाजी महाले, बाबूराव महाले, दिनेश महाले, नारायण महाले, ताराचंद महाले, केशव महाले यांच्या आंबा फळबागेचे नुकसान झाले आहे.

उंबरठाणला यांचे झाले नुकसान

माधव पवार, हुसैन बेस, हमीद वाणी, इलियाज बेस, गुलाब शेख, शब्बीर हेडी, याकूब बेस, फरीद बेस, शिवा पवार, संतू घुले, हमीद वाणी, अझरुद्दीन शेनके, भीमा चौधरी, राजेंद्र गावित, गोटीराम देशमुख, शिवराम पवार, हिरामण खोटरे, गणू पेटार, लक्ष्मण देशमुख, तुळशीराम खोटरे, भास्कर देशमुख, लक्ष्मण खोटरे, कैलास वाघमारे, काशीनाथ वाघमारे यांच्या घरावरील छप्पर उडाले आहे.

आंब्याचे नुकसान झालेले शेतकरी

निळूबाई बागूल, लक्ष्मण बागूल, परसराम बागूल, भिका राऊत, हरी गावित, सुरेश बागूल, मोतीराम राऊत, किसन बागूल, पांडू बागूल, पांडुरंग बागूल, चंद्रा बागूल, विनोद बागूल, भास्कर गायकवाड, नारायण भोये, सीताराम पासारे, देवराव भगरे, जय पासारे, नामदेव वाडेकर, लक्ष्मी घाटाळ, बनश्या बागूल, रामा राऊत.

आनंदा बागूल, अमृता बागूल, महादू राऊत, पांडुरंग गावित, रावजी माहोवरे, हरी मोहावरे तर बेहुडणे येथील विठ्ठल चौधरी, वसंत चौधरी, यशवंत महाकाळ, यशवंत पवार, मणिराम देशमुख, सुनील ठाकरे, जाणू देशमुख, रामदास देशमुख, मनोहर गावित, आशुराम गावित, कमलाकर चौधरी, भाऊराव चौधरी, वसंत चौधरी, तुकाराम चौधरी, चिंतामण देशमुख, हरी देशमुख यांच्या घरांचे व आंबा फळबागेचे नुकसान झाले आहे.

"साडेतीन ते चारच्या सुमारास उंबरठाण परिसरात जोरदार चक्रीवादळ व गारपिटीने घरांचे पत्रे उडाले. आंबा उत्पादक शेतकऱ्यांनाही फटका बसला. कृषी सहाय्यक, तलाठी, मंडळ कृषी अधिकाऱ्यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत." - रामजी राठोड, तहसीलदार, सुरगाणा

"बेहुडणे गावी शेतात ३५ ते ४० केशर, हापूस, राजापुरी आंब्याची बाग आहेत. मला दरवर्षी यापासून चाळीस ते पन्नास हजार रुपये उत्पन्न मिळते. यावर्षी वादळी पावसाने व चक्रीवादळाने मोठे नुकसान झाले आहे. तातडीने पंचनामे करून भरपाई मिळावी." - विठ्ठल चौधरी, आंबा उत्पादक, बेहुडणे

"उंबरठाण परिसरात तीन ते साडेतीनच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. गावातील २५ ते ३० घरावरील पत्रे, छप्पर उडाल्याने काहींच्या घरात पावसाचे पाणी गेले. पंचनामे करून भरपाई मिळावी." - शिवराम पवार, उंबरठाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT