Collector Jalaj Sharma, along with Chief Engineer of Water Resources Department Prakash Misal, Regional Water Conservation Officer Haribhau Gite, while inaugurating the Gangapur Dam Desilting Project under Water Rich Nashik Initiative. esakal
नाशिक

Nashik News : गंगावऱ्हेतून ‘गाळमुक्त धरणास’ प्रारंभ; जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते प्रारंभ

Nashik : जिल्हा प्रशासनासह स्वयंसेवी संस्थांनी हाती घेतलेल्या ‘जलसमृद्ध नाशिक’ अभियानास मंगळवारी (ता. १६) गंगावऱ्हे (ता. नाशिक) येथील गंगापूर धरणापासून प्रारंभ झाला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : धरणांमधील गाळ काढून साठवण क्षमता वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनासह स्वयंसेवी संस्थांनी हाती घेतलेल्या ‘जलसमृद्ध नाशिक’ अभियानास मंगळवारी (ता. १६) गंगावऱ्हे (ता. नाशिक) येथील गंगापूर धरणापासून प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते अभियानाचा प्रारंभ झाला. या वेळी उपस्थित उद्योजकांनी एक ते अकरा लाखांपर्यंत ४२ लाखांची ‘ऑन द स्पॉट’ देणगी देऊन अभियानास सहकार्य केले. (Nashik Inauguration by Collector Jalaj Sharma of Sludge from dam started from Ganga marathi news)

राज्य शासनाच्या ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात ‘जलसमृद्ध नाशिक’ अभियान २०२४ राबविण्यात येत आहे. या वेळी जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, की ‘बुंद बुंद से सागर बनता है’ या म्हणीप्रमाणे पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. धरणात साठलेले पाणी नागरिकांना पिण्यासाठी वापरात येईल.

त्यामुळे धरणांमध्ये साठलेला गाळ काढण्यासाठी ‘जलसमृद्ध नाशिक’ अभियान २०२४ हाती घेतले आहे. पुढील दोन महिन्यांत धरणांतील गाळ काढून साठवण क्षमता वाढविण्यात येईल. तसेच, जमिनीची धूप कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. यात लोकांचा सहभाग झपाट्याने वाढेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

फक्त नाशिकच नव्हे, तर जिल्ह्याबाहेरील धरणांमध्ये गाळ काढण्याची परवानगी दिली जाईल, असे आश्‍वासन जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ यांनी दिले. ‘ईएसडीएस’चे संचालक पीयूष सोमाणी, विनझिप टेक्नॉलॉजीचे मकरंद सावरकर, आर्ट ऑफ लिव्हिंगचे विजय हाके, नाशिक मानव सेवा संघटनेचे राजा जॉली यांनीही मनोगत व्यक्त केले. शहरातील बांधकाम व्यावसायिक, उद्योजकांसह स्वयंसेवी संस्थांनी एकत्रितपणे ‘समृद्ध नाशिक फाउंडेशन’ची स्थापना केली. या फाउंडेशनच्या माध्यमातून गंगापूर धरणातून दोन महिने गाळ काढण्यात येणार आहे. (latest marathi news)

त्याच्या प्रारंभप्रसंगी जिल्हाधिकारी शर्मा, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, सहाय्यक उपजिल्हाधिकारी जतिन रहेमान, मृद व जलसंधारण विभागाचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता मिसाळ, अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, जलसंपदा नाशिक विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, जिल्हा परिषद जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे यांच्यासह शहरातील विविध संघटनांचे प्रतिनिधी, व्यावसायिक, गंगावऱ्हे, सावरगाव, बेळगावढगा येथील ग्रामस्थ उपस्थित होते. नंदकुमार साखला यांनी प्रास्ताविक केले. रमेश वैश्‍य यांनी आभार मानले.

‘सकाळ’चे विशेष कौतुक

जिल्हा प्रशासन व समृद्ध नाशिक फाउंडेशन यांनी गाळ काढण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न सुरू केले आहेत. ‘सकाळ फाउंडेशन’ने यापूर्वीही धरणांमधील गाळ काढला. यावर्षीही त्यांनी तीन धरणांची परवानगी आपल्याकडून घेतल्याची माहिती जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ यांनी दिली. तसेच, गंगावऱ्हेचे सरपंच लक्ष्मण बेंडकुळे यांनी ‘सकाळ’ने गेल्या वर्षी धरणातील गाळ काढल्याने अजूनही पाणीसाठा टिकून असल्याचे सांगितले.

जलसमृद्धचे देणगीदार

पीयूष सोमाणी : ११ लाख रु.

ताराचंद गुप्ता : ५ लाख रु.

जयेश ठक्कर : ५ लाख रु.

नाशिक मानव सेवा फाउंडेशन : ५ लाख रु.

एबीएच डेव्हलपर्स : ५ लाख रु.

कृणाल पाटील : ५ लाख रु.

सागर बोंडे : २ लाख रु.

उमेश मराठे, सुमेरकुमार काले, नरेंद्र पाटील, रोटरी क्लब ः प्रत्येकी एक लाख रु.

पहिल्या दिवशी सहा जेसीबी, आठ डंपर

जलसमृद्ध अभियानाच्या पहिल्या दिवशी गंगापूर धरणातून सहा मोठ्या जेसीबीद्वारे गाळ काढण्यात आला. आठ डंपर व ट्रॅक्टरद्वारे गाळ वाहून नेण्यात आला. गंगावऱ्हे गावातील नामदेव बेंडकुळे यांच्या शेतात पहिला ट्रॅक्टर पोहोचला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Teachers Protest : आंबेगाव तालुक्यात शुक्रवारी शिक्षकांचा ‘आक्रोश मोर्चा’; २८२ शाळांतील १,१५० शिक्षक सामूहिक रजेवर!

Pune Crime : नीलेश घायवळचा नंबरकारी अजय सरवदेकडून पिस्तुलासह चारशे काडतुसे जप्त!

Lawrence Bishnoi Vs Goldy Brar : "बनाने वाले मिटाना भी जानते हैं" ; लॉरेन्स बिश्नोई टोळीचा गँगस्टर गोल्डी ब्रारवर पलटवार!

IND vs SA, 2nd ODI: मार्करमचं शतक अन् द. आफ्रिकेचा भारतावर रोमहर्षक विजय! ब्रेव्हिस-ब्रिट्सकेही चमकले; विराट-ऋतुराजची शतके व्यर्थ

Akola Police : २१ दिवसांची धाडसी शोधमोहीम यशस्वी; हरवलेल्या १४ वर्षीय बालकाचा शोध; अकोला पोलिसांची विशेष कामगिरी!

SCROLL FOR NEXT