Nashik Vegetable Rate Hike esakal
नाशिक

Nashik Vegetable Rate Hike : आवक घटली; पालेभाज्या दर वधारले

Nashik News : वातावरणात बदल झाला असून परिणामी पालेभाज्या आवक सद्यःस्थितीत सुमारे वीस ते तीस टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे बहुतांश पालेभाज्या दर वधारले आहेत.

योगेश मोरे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा तडाखा पुन्हा वाढला आहे. मध्यंतरी वळिवाच्या पाऊसदेखील आला होता. यामुळे वातावरणात बदल झाला असून परिणामी पालेभाज्या आवक सद्यःस्थितीत सुमारे वीस ते तीस टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे बहुतांश पालेभाज्या दर वधारले आहेत. (Income decreased Leafy vegetable prices increased)

यात गावठी कोथिंबीर किमान ७० रुपये झुडी, सर्वाधिक १२१ रुपये झुडी व चायना कोथिंबिरीला किमान ६५ रुपये झुडी तर सर्वाधिक १२६ रुपये झुडीचा भाव आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सद्यःस्थितीत नाशिक, सिन्नर, दिंडोरी, पिंपळगाव, त्र्यंबकेश्वर आदी भागांतून पालेभाज्या व फळभाज्या येत आहेत.

बाजार समितीत खरेदी केलेला शेतमाल हा मुंबई, गुजरात अहमदाबादकडे पाठविला जातो आणि काही प्रमाणात हा स्थानिक विक्रीसाठी व्यापारी खरेदी करत असतात. पालेभाज्यांची आवक सद्यःस्थितीत सुमारे वीस ते तीस टक्क्यांवर आली आहे. (latest marathi news)

यामुळे दर वधारले असून स्थानिक पातळीवर होणारी विक्री किंमत परिणामी वाढली आहे. बाजार समितीत शुक्रवारी (ता.३१) झालेल्या लिलावात गावठी कोथिंबीर ७० ते १२१ रुपये झूडी, चायना कोथिंबीर ६५ ते १२६ रुपये झुडी.

मेथी ३० ते ४९ रुपये झुडी, शेपू ४० ते ८६ रुपये झुडी, कांदापात १५ ते ७८ रुपये झुडीला भाव मिळाला आहे. तेच किरकोळ बाजारात कोथिंबीर, मेथी, शेपू, कांदापात यांची झुडी छोटी करून डबल बाजार भावाने विक्री होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: ‘माझी टिंगल करा, मला वाईट वाटणार नाही’; जरांगेंच्या टीकेला बावनकुळेंचा सडेतोड पलटवार, एकही दाखला रद्द केलेला नाही

Shirur Kasar Loan Waiver: चार हजार ५२१ शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मार्ग झाला मोकळा; शिरूर कासार; कर्जमुक्तीची पहिल्या टप्प्याची यादी जाहीर; आधार प्रमाणीकरणाचे आवाहन

Beed Water Shortage:आष्टी शहरासाठी १९ टँकरच्या खेपा; आष्टीकरांचे डोळे आकाशाकडे; १५ ते २० दिवसांनी मिळतंय पाणी

Marathi News Live Updates : डी. के. शिवकुमार यांच्या सरकारमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी RSS वर बंदी घालून दाखवावी; भाजप प्रदेशाध्यक्षांचं ऑपन चॅलेंज

August 2026 Horoscope: नोकरीत प्रमोशन, व्यवसायात नफा अन् उत्पन्नाचे नवे मार्ग; ऑगस्टमध्ये ‘या’ ४ राशींचे दिवस बदलणार

SCROLL FOR NEXT