Commissioner Praveen Gedam esakal
नाशिक

Nashik News : पोलिसांनी कारवाई करावी : आयुक्त प्रवीण गेडाम

Nashik News : अपक्ष उमेदवार किशोर प्रभाकर दराडे यांना नाशिक रोड येथील पाच जिल्ह्यांचे मुख्य केंद्र असणाऱ्या विभागीय आयुक्त कार्यालयात धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : अपक्ष उमेदवार किशोर प्रभाकर दराडे यांना नाशिक रोड येथील पाच जिल्ह्यांचे मुख्य केंद्र असणाऱ्या विभागीय आयुक्त कार्यालयात धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली आहे. या संदर्भात पोलिसांनी कारवाई करावी, असे विभागीय आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण गेडाम यांनी सांगितले. या संदर्भात पोलिसांना हव्या असलेल्या सर्व गोष्टी आम्ही देऊ, असेही ते म्हणाले.

नाशिक रोड येथे ७ जूनला अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कोपरगाव येथील अपक्ष उमेदवार किशोर प्रभाकर दराडे यांना माजी आमदार किशोर दराडे यांच्या समर्थकांनी मारहाण आणि धक्काबुक्की केली. ही घटना विभागीय आयुक्त कार्यालयात घडली. या ठिकाणी सीसीटीव्ही लावलेले आहेत.

येथील कार्यालयाचे मुख्य अधिकारी महसूल आयुक्त आहेत. त्यांच्या दालनात हा प्रकार घडलेला असल्याने त्यांनी पोलिसांना कारवाईचे आदेश द्यायला हवेत, अशी प्रतिक्रिया शिक्षक मतदारांमधून व्यक्त केली जात आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम काय कारवाई करतात, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे. (latest marathi news)

"धक्काबुक्कीचा विषय माझ्या केबिनच्या बाहेर झाला आहे. हा विषय पोलिसांच्या अखत्यारीतला आहे. पोलिसांनी फुटेज मागितल्यास आम्ही त्यांना देऊ. या संबंधी सहाय्यक पोलिस आयुक्त योग्य ती कारवाई करतील." - प्रवीण गेडाम, विभागीय आयुक्त, नाशिक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : भोंदू खरात प्रकरणानंतर राज्यभर कारवाईचा धडाका; महिन्यात 15 भोंदू बाबांवर गुन्हे दाखल, नाव-गावासह 'अंनिस'ने यादीच केली जाहीर

IPL 2026 : स्टार खेळाडूंसोबत शेवटचा'सेल्फी'! १४ वर्षीय अभव, २० वर्षीय क्रिकेटपटूचा जागीच मृत्यू; DC vs RCB सामन्यानंतर भयानक घडलं

ओबेन इलेक्ट्रिककडून Rs. 99,999 रूपये या सुरुवातीच्या किमतीत Rorr EVO सुपर बाइक लाँच; दमदार फीचर्स पाहा

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील खुपिरे येथील सुरभी लॉजवर पोलिसांचा छापा

MLC Election: झीशान सिद्दीकींच्या उमेदवारीमुळे वाद पेटला; एक बडा नेता शिवसेनेकडे वळला? तर दुसरा दुखावला, राष्ट्रवादीत बंडाची चाहूल!

SCROLL FOR NEXT